Posts

Showing posts from 2019

अमर वीर हुतात्मा कोठारी बंधू

Image
                                                                                                    ।। जय श्रीराम ।। हुतात्मा कोठारी बंधू तो काळ १९८९ चा होता, अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनाने अवघा हिंदुस्थान भारावून गेला होता. प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीला स्वतंत्र करून, भारत मातेच्या मस्तकी असणारा परकीय आक्रमकांचा, कलंक पुसून टाकण्यासाठी हिंदू समाज व्याकुळ झाला होता. सप्टें १९८९ ला ठीक-ठिकाणी श्रीराम ज्योत पूजन करण्यात येत होते, याच कार्यक्रमाच्या माध्यमातून कलकत्त्याचे दोन सख्खे बंधू रामकुमार आणि शरद कुमार कोठारी या २०-२२ वर्षाच्या तरुणांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. हे दोघे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आधीपासून करीत होते आणि त्यावेळी ते द्वितीय वर्ष शिक्षित होते. कोठारी बंधूनी १०० हुन अधिक ठिकाणी "श्री रामज्योत पूजन" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ऑक्टो १९९० ला अयोध्येमध्ये जाऊन कारसेवा करायचे ठरले मा. अशोकजी सिंघल यांनी आवाहन केले " चलो अयोध्या ..... " (कारसेवा याचा अर्थ स्वतःच्या करकमलांनी (हातांनी) करायची सेवा). अशोकजींचे आवाहन समज

नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात…

Image
खालील काव्यरचनेचा जीवित किंवा मृत कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही....  ______________________________________________________________________________ © श्रीपाद श्रीकांत रामदासी सर्व छयाचित्रे इंटरनेटवरून साभार ..... वैशाखाच्या वणव्यावरती... श्रावणाने धरली झारी ....  आणि मग उमटलं एक काल्पनिक बालगीत ....         नाच रे पोरा....     (चाल सांगण्याची गरज आहे का ?) नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात… नाच रे पोरा नाच.... काळा काळा रोड खचला रे चिखलात टायर फसला रे रस्त्यावर छान छान खड्ड्यांची कमान ... कमानीत पडून त्या नाच ....  नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात… नाच रे पोरा नाच.... गटारं सारी तुंबली रे शाळेची बस त्यात डुंबली रे दुरुस्तीच्या वेळी तुला देतो गोळी खाऊन गोळी ती नाच ... नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात…. नाच रे पोरा नाच....  पावसाच्या सरी थांबतील रे     खड्डे सारे मग ते बुजतील रे खड्डे भरून घेऊन         विसरून जाऊन पुढच्या वर्षी पुन्हा तू नाच.. ...... नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात….. नाच रे पोरा नाच.... © श्रीपाद श्रीकांत रामदासी

।। गाथा महाराष्ट्राची ।।

Image
।। गाथा महाराष्ट्राची ।। © श्रीपाद श्रीकांत रामदासी उठा उठा हो मरहट्ट्यानो , सांगतो गाथा महाराष्ट्राची गाथा सांगतो जन्मभूमीची , धर्मभूमी अन पुण्यभूमीची ।।धृ ।। असे जन्मभू ही वीरांची , असे कर्मभू ही संतांची असे मायभू ही वाघांची , असे जन्मभू ही छाव्यांची ।। १ ।। असे भूमी ही गुणवंताची , असे भूमी ही कलावंतांची असे भूमी ही नितीवंतांची , असे भूमी ही कीर्तिवंतांची ।। २ ।। जन्मभूमीही सत्यशोधकांची , जननी ही सुधारकांची उत्पत्ती येथेच हिंदुत्वाची , हीच जन्मभू चळवळींची ।। ३ ।। जन्मभूमीही अभिनेत्यांची , कर्मभूमीही लोकनेत्यांची जन्मभूमीही खेळाडूंची , कर्मभूमीही साहित्यिकांची ।। ४ ।। या भूमीनेच रचली मेढ स्वातंत्र्याची शिव शंभूंनी लाज राखली सदैव धर्माची ।। ५ ।। या भूमीनेच लाज राखली ती बुदेल्यांची त्वरे धावले वायुवेगे ते राव बाजी ।। ६ ।। हिमालयाला साथ झाली केवळ सह्याद्रीची नका विसरू आठवण ती पानिपताची ।। ७ ।। सह्याद्रीचे सिंह आम्ही , भीती ना कोणाची उंच आभाळी सदा फडकवू , ध्वजा धर्माची ।। ८ ।। संस्कृती येथे वारकऱ्यांची , परी परंपरा ही

स्वा.सावरकरांकडून काय शिकावे ?

Image
  सावरकरांकडून काय शिकावे ? © श्रीपाद श्रीकांत रामदासी आज २६ फेब्रुवारी अर्थात स्वा. सावरकरांचा आत्मार्पण दिन, सर्वप्रथम स्वा. सावरकरांना विनम्र अभिवादन !!! स्वा.सावरकरांच्या विचारातून , चरित्रातून आजच्या पिढीने नेमके काय घ्यावे ? " जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " या उक्तीस आदर्श मानून प्रत्यक्षात स्वर्ग जरी मिळत असेल तरी त्याचे मूल्य , आपल्या मातृभूमीपेक्षा , राष्ट्रभूमीपेक्षा कमीच समजावे. आपले राष्ट्र आपली मायभूमी हेच आपले सर्वस्व मानून तिच्यासाठी प्रसंगी , प्राणत्याग करण्याची तयारी देखील असावी. " राखावी बहुतांची अंतरे " या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त जन संपर्क करावा. अनेक मित्र , सखे , सोबती यांना जोडले जावे , आणि त्यातून निर्माण होणारे संघटन हे नैतिक कार्यासाठी क्रियावान करावे. आपले राष्ट्र , आपला धर्म , आपली संस्कृती यांच्या सन्मानार्थ प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी , न डगमगता संघर्ष करावा. असा संघर्ष करीत असताना , केवळ भावना प्रधान न राहता. स्थिर बुद्धीने आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने निर्णय घ्यावेत. आपले कार्य किती मोल

स्वा.सावरकर ज्येष्ठ नागरीक संघ धायरी येथे झाले व्याख्यान

Image
स्वा.सावरकर ज्येष्ठ नागरीक संघ धायरी येथे आज व्याख्यान झाले. विषय होता "  सावरकर समजून घेताना  " सर्व प्रथम पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले सैनिक, दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस, सिने नाट्य अभिनेते रमेश भाटकर यांना श्रद्धांजली वाहून, कार्यक्रमाची सुरुवात झाली. साधारण पणे १२५ हून अधिक श्रोते होते.... यावेळेसचा विषय जरा वेगळा होता.... त्यामुळे केवळ सावरकर चरित्रातील घटना न सांगता गेल्या ३-४ वर्षांत घडलेल्या सामाजिक, राजकीय घटना, भारतावर झालेले दहशतवादी हल्ले, इ. विषयांचे संदर्भ देत, सावरकरांनी त्याबद्दल ८०-९० वर्षांपूर्वी मांडलेले विचार, त्यांच्या प्रत्येक कृती मागची पार्श्वभूमी उलगडत ६०-७० मिनिटे व्याख्यान चालले होते. सावरकर आत्मार्पण निमित्ताने हे व्याख्यान असल्याने, सावरकरांचे प्रायोपवेशन, अंतयात्रा आणि त्यांच्या पश्चात आणि अगदी आजही सावरकरांची होत असलेली अवहेलना यावरही भाष्य केले. सावरकरकरांचा अंतिम प्रवास सांगत असताना बऱ्याच श्रोत्यांना अश्रू अनावर झाले होते..... खरं तर मलाही शेवटी शेवटी गहिवरून आले होते..... व्याख्यान संपल्यावर काही क्षण शांतता होती आणि

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेधसभा - वडगांव बु.

Image
आज १५ फेब्रुवारी २०१९..... वडगांव बु. येथे पाकिस्तानच्या निषेधसभेला संबोधित करताना, मी खालील विचार मांडले... पाकिस्तानचे कंबरडे मोडायचे असेल तर, त्याच्या बुडावर नाही तर पोटावर लाथ मारली पाहिजे, त्यासाठी सर्वप्रथम त्याला पैसा पुरवणाऱ्या चीनशी व्यवहार कमी करावे लागतील, त्यामुळे आपण सणासुदीला जर कोणतीही चिनी वस्तू घेत असू तर सर्वप्रथम हा विचार करावा की यातून चीनला मिळणारा पैसा, हा आपल्या सैनिकांच्या मृत्यूचे कारण तर बनणार नाही ना ? सिनेकलावंत, भाई, डॉन यांना आदर्श मानण्यापेक्षा या राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांना आणि हुतात्मा सैनिकांनाच आदर्श मानले पाहिजे. आपापसात जात, वर्ण, वंश, प्रांत, भाषा यांवरून भांडण्यापेक्षा एकदिलाने राष्ट्रावरील संकट निवारण्याकरिता एकत्र आले पाहिजे. आपल्या आजूबाजूला काही संशयित घडामोडी घडत असतील, कोणी संशयित व्यक्ती फिरत असतील तर अश्यांच्या बाबतीत चौकशी करून, पोलीस यंत्रणेशी संपर्क केला पाहिजे. नागरिकाचे रूप घेऊन जर कोणी राष्ट्रद्रोह करत असेल तर त्या बद्दल सावधान राहणे आणि जागरूक राहणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रसुरक्षा

हे वागणं बरं नव्ह !!!

____________________________________________________________________ शब्दांकन :  श्रीपाद श्रीकांत रामदासी ७ फेब्रुवारी २०१९ रोजी , नवी दिल्ली येथे अल्पसंख्यांक परिषदेला , संबोधित करीत असताना राहुल गांधी यांनी सावरकरांना ' डरपोक ' असे संबोधले. त्यांच्या ३३-३४ मिनिटे चाललेल्या भाषणामध्ये २१-२२ व्या मिनिटाला त्यांनी अत्यंत जोश पूर्णपणे असे उदगार काढले की , " आपके सामने जो लोग खडे है , चाहे वो आर एस एस हो , चाहे वो बी जे पी हो , चाहे वो नरेंद्र मोदी हो , चाहे वो सावरकर हो , ये डरपोक लोग है " [ या भाषणाचे चलचित्र संदर्भासाठी राखून ठेवले आहे] मला हा प्रश्न पडलाय की स्वा.सावरकर हे या निवडणुकीत नेमक्या कोणत्या मतदार संघातून उभे आहेत ?  आणि तेही मृत्यूपश्चात ५३ वर्षांनी ??? याच भाषणात त्यांनी सावरकरांनी माफीनामा कसा लिहिला याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. आपल्याच नव्हे तर आपल्या पित्याच्या जन्मापूर्वी २० वर्षे न घडलेल्या घटनेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याची कला , राहुल गांधींना कशी जमली हे एक कोडे आहे. दुसरे असे की राहुल गांधी ज्या सावरकरांना &#

गांधी - सावरकर - गांधी

गांधी - सावरकर - गांधी © श्रीपाद श्रीकांत रामदासी   नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना , बापूजींचे पणतू ‘ तुषार गांधी ’ यांनी " बापूजींच्या हत्येमागे सावरकर हेच होते " असे विधान केल्याचे ३१ डिसेम्बर २०१८ रोजी , महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांतून आम्ही वाचले [ या वृत्ताची प्रत , संदर्भासाठी राखून ठेवलेली आहे ] गांधीजींची झालेली हत्या , ही दुःखदायकच होती यात दुमत नाही , परंतु त्या हत्येमध्ये वीर सावरकरांचे नाव विनाकारण गोवणे हे तेंव्हाही आणि आत्ताही , दुर्दैवीच आहे असे माझे स्पष्ट मत आहे. खरे तर गांधी हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग असण्याचे कोणतेच कारण नाही , किंवा सावरकरांना गांधीहत्या व्हावी असे वाटण्याचे कारणच काय ? सावरकर आपल्या भाषणांतून , लेखनातून गांधीजींवर टीका करत होते , हे तर जगजाहीरच आहे. सावरकर आणि गांधीजी यांच्यातील वैचारिक विरोध हे काही लपून राहिले नव्हते , त्याचप्रमाणे गांधीजींवर टीका करणारे सावरकर हे काही एकटेच नव्हते. समकालीन नेते नव्हते , सावरकरांना जसे गांधींजींचे अति अहिंसेचे , मुस्लिम लांगूलचालनाचे वर्तन मान्य नव्हते , त्याच प्रमाणे डॉ.