सावरकरांना भारतरत्न का द्यावे ?
।। श्रीराम ।। विनायक दामोदर सावरकर २८ मे १८८३ - २६ फेब्रु. १९६६ दि. १६-११-२०१८ रोजी वीर बाजी पासलकर स्मारक , सिंहगड रस्ता पुणे. येथे केलेल्या भाषणाचा सारांश.... नमस्कार ! स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी करण्यासाठी , सावरकर प्रेमींच्या सह्या घेण्याचा उपक्रम श्री.सुनील मारणे सुरु करत आहेत. त्या संदर्भातील एका महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मला सावरकर अभ्यासक या नात्याने , सावरकरांना भारतरत्न का द्यावे ? हा विषय मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्या प्रसंगी , ३५ मिनिटे चाललेल्या भाषणाचा सारांश वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. याप्रसंगी , श्री.सुनील मारणे , श्री.बाप्पू शिळमकर , श्री.प्रीतम बहिरट , श्री.केतन घोडके , स्तंभलेखक तुषार दामगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सावरकरांना भारतरत्न का द्यावे ? जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वां अहं यशोयुतां वंदे ।। स्वातंत्र्यदेवतेला भगवतीचे (देवीचे) रूप मानणारे आणि परवशतता , जातीय उच्चनीचतेच्या अंधकाराने हतबद्ध झालेल्या भारतीय जनतेस आपल्या सशक्त आणि सशस्त्र करकमलांनी