Posts

Showing posts from September, 2018

कालव्याची कालवा कालव

                                                                                         दि. २९ सप्टेंबर २०१८  २७ सप्टेंबर २०१८ सकाळची गडबड संपवून वस्तीतील महिला, घरातील उरले सुरले काम आटोपत होत्या, काही जण आपापल्याला मुलांना शाळेत सोडायला निघालेले, तर काहीजण परत आणायला.... सारं कसं अगदी रोजच्या सारखं चाललं होतं.... पण एवढ्यात गिल्ला झाला, पाणी पाणी पाणी ........  पाहता पाहता पाण्याचा जोरदार लोंढा रस्त्यावरून वाहू लागला. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता कि वाटेत जे येईल ते पार बुडून, वाहून जाऊ लागले. पाऊस नसताना, रणरणत्या उन्हात एवढे जलौघ आला तरी कुठून ???? कोणी तरी ओरडले कालवा फुटला......  कालवा फुटला ..... आणि पाहता पाहता वाटेत येईल त्याला भुसपाट करत आपल्यासोबत ओढत, फरपटत.. पाण्याचे लोंढेच्या लोंढे आजूबाजूच्या घराघरातून घुसले, तकलादू पत्र्याची घरे...  घरे कसली,  खरं तर पाठ टेकवण्यासाठी, आणि मुळातच असलेला फाटका संसार झाकण्यासाठीची केलेली खटपट; पाहता पाहता पाण्यासोबत वाहून गेली.......                                      " भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले,