स्वदेशीला राजाश्रय हवाच !
[दै. प्रभात (पुणे शहर आवृत्ती) १७-१०-२०२०] नमस्कार ! आज दै. प्रभात (पुणे शहर आवृत्ती ) मधील, चीन मधून ए. सी. आयात करण्यावर बंदी घालण्याच्या, केंद्र सरकारच्या निर्णया संदर्भातली बातमी वाचली. केंद्र सरकारने देशी उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असेही समजले. हा निर्णय वाचून, एका शिवकालीन ऐतिहासिक संदर्भाची आठवण झाली. १६७१ साली, कोकण किनारपट्टीवर बारदेशातून आणलेले मीठ विकले जात असे. ते मीठ देशी मिठागरातील मिठापेक्षा स्वस्त असल्याने, त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असे. पर्यायाने देशी मीठ तसेच पडून राहून देशी व्यापाऱ्यांचे नुकसान होत असे. हि बाब महाराजांना समजताच, त्यांनी आपल्या कुडाळच्या सरसुभेदारांस बारदेशातून येणाऱ्या मिठावर जबर जकात बसवण्याची आज्ञा केली. महाराजांनी स्पष्टपणे लिहिले की; ही जकात इतकी जबर असावी की काही झाले तरी बारदेशचे मीठ हे देशी मिठापेक्षा खूपच महाग झाले पाहिजे. महाराज लिहितात ; " ..... बारदेशात मीठ विकते, त्याने कितेक जबर पडते, ते मनास आणून त्या अजमासें जकात जबर बैसवणे की संगमेश्वरी विकतें आणि घाटपावेतो जे बेरीज पडेल त्या हिशेबी बारद