Posts

Showing posts from 2014
सप्रेम  नमस्कार ,      जय जय रघुवीर समर्थ ,                 मागील पिढीतील महान रामदासी व पुढे शंकराचार्य झालेले श्री कल्याणसेवक महाराज यांनी  समर्थ रामदास स्वामींच्या 'आत्माराम ' या   ग्रंथावर ३०० पानांचे विशाल टीकाभाष्य लिहिले आहे'  हा ग्रंथ अत्यंत दुर्मिळ असून अत्यंत महत्वाचा आहे.         त्याच्या नवीन   आवृत्तीच्या प्रकाशनाचे कार्य रामदासी संप्रदायाचे संशोधक ,लेखक श्री.प्रमोदजी संत ,नागपूर यांनी हाती घेतले आहे.    आषाढ शु . त्रयोदशी ,दि. १० जुलै २०१४ रोजी श्री संत कल्याणसेवक महाराज यांनी लिहिलेल्या श्री समर्थांच्या आत्माराम या ग्रंथावरील 'कल्याणी टीकेचे ' प्रकाशन झाले . ३२७ पृष्ठांचा श्री आत्माराम कल्याणी टीका हा ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्ण असून तो सर्व समर्थ भक्तांच्या संग्रही असावा असा आहे . पु. बाबा बेलसरे यांच्या दासबोध भाष्याप्रमाणे यातील टीका आहे. डबलडेमी(मासिकाच्या ) आकाराचा  हा ग्रंथ ३०० पानांपेक्षा मोठा असून याच्या  प...