।। गाथा महाराष्ट्राची ।।
।। गाथा महाराष्ट्राची ।। © श्रीपाद श्रीकांत रामदासी उठा उठा हो मरहट्ट्यानो , सांगतो गाथा महाराष्ट्राची गाथा सांगतो जन्मभूमीची , धर्मभूमी अन पुण्यभूमीची ।।धृ ।। असे जन्मभू ही वीरांची , असे कर्मभू ही संतांची असे मायभू ही वाघांची , असे जन्मभू ही छाव्यांची ।। १ ।। असे भूमी ही गुणवंताची , असे भूमी ही कलावंतांची असे भूमी ही नितीवंतांची , असे भूमी ही कीर्तिवंतांची ।। २ ।। जन्मभूमीही सत्यशोधकांची , जननी ही सुधारकांची उत्पत्ती येथेच हिंदुत्वाची , हीच जन्मभू चळवळींची ।। ३ ।। जन्मभूमीही अभिनेत्यांची , कर्मभूमीही लोकनेत्यांची जन्मभूमीही खेळाडूंची , कर्मभूमीही साहित्यिकांची ।। ४ ।। या भूमीनेच रचली मेढ स्वातंत्र्याची शिव शंभूंनी लाज राखली सदैव धर्माची ।। ५ ।। या भूमीनेच लाज राखली ती बुदेल्यांची त्वरे धावले वायुवेगे ते राव बाजी ।। ६ ।। हिमालयाला साथ झाली केवळ सह्याद्रीची नका विसरू आठवण ती पानिपताची ।। ७ ।। सह्याद्रीचे सिंह आम्ही , भीती ना कोणाची उंच आभाळी सदा फडकवू , ध्वजा धर्माची ।। ८ ।। संस्कृती येथे वारकऱ्यांची , परी परंपरा ही ...