कल्पतरू : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
छायाचित्र सौजन्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर येते नामस्मरण! आजच्या युगात नामस्मरणात किती प्रचंड सामर्थ्य आहे हे अतिशय साध्या, सोप्या शब्दात रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन गोंदवलेकर महाराजांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही वेळी, स्थळी, सोवळे ओवळे न पाळता अतिशय सहजपणे पण तळमळीने घेतलेले नाम आपल्याला खूप समाधान देते आणि रामापर्यंत पोचण्याचे सहज, सोपे साधन आहे असे महाराज आपल्याला कळकळीने सांगतात. महाराजांनी सांगितलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान! पोटभर जेवल्यावर जि तृप्तता मिळते ती इतर कोणत्याही वस्तू कितीही प्रमाणात मिळाल्या तरी नसते. आजही गोंदवल्यात हे अन्नदान अव्याहतपणे चालू आहे. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या पाठीशी महाराज कायमच असतात याचे कितीतरी अनुभव अनेक लोकांना येत असतात. म्हणूनच जो एकदा गोंदवल्याला येतो तो कायमचा इथलाच होऊन जातो. मी सुद्धा महाराजांवर श्रद्धा असणारी अतिशय लहान व्यक्ती आहे. खरं तर महाराजांवर काही लिहिण्याइतकी मी काही मोठी नाही किंवा माझी एवढी साधनाही नाही. पण माझी श्रद्धा आहे महाराजांवर आणि प्रत्येक प्रसंगात ते माझ्या पा