Posts

Showing posts from November, 2023

शुभ सकाळ (उत्तरार्ध )

   ........ डॉ. राकेशने तात्काळ आपली बॅग उचलली आणि निसरड्या वाटेवरून झपाझप पावले टाकीत, काहीसे धापा टाकतच रंगरावांच्या घरी पोहोचले, तपासणी करताना लक्षात आले की हा सौम्य हृदयविकाराचा झटका आहे. अश्या रुग्णांना आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध नव्हती, आणि तालुक्याहुन ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्याची शक्यता पण कमी होती .... त्यांनी सांगितले की; " मोठ्या गाडीची करावी लागेल, यांना तालुक्याला न्यावे लागेल .... " खरं तर हे सांगितल्यावर स्वतः डॉक्टरांनाच कसे तरी वाटले; कारण पुरात गावातल्या बहुतेक गाड्या खराब झाल्या होत्या... नाही म्हणायला प्रतापरावांची   गाडी तेव्हढी वाचली होती.... प्रतापराव आणि रंगराव यांचं वैर तर जगजाहीर होते, त्यातून नुकतीच त्यांच्यातली झालेली चढाओढ याने तर दोघांतील दुहीचा कळसच गाठला होता. अश्या परिस्थितीत प्रतापरावांकडे रंगरावांसाठी मदत मागायची म्हणजे, मदत मागणाऱ्याचीच कत्तल होती. निळकंठ म्हणाला " डॉक्टर...   प्रतापरावांशिवाय कुणाचीच गाडी न्हाय आता .... कसं करावं म्हंता ? " डॉ. राकेश म्हणाले " प्रतापरावांकडे या कामासाठी जायचे म्हणजे ये रे ये