सं-सा-र त्रिसूत्री
बऱ्याच कुटुंबातून सध्या , गृहकलह वाढत असल्याचे जाणवले; दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले. कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच जबाबदार धरले जाते , परंतु यामध्ये पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. कुटुंबातील सर्वच सदस्यांनी सामंजस्याने घेतले तर असे तणाव दूर होण्यास नक्कीच सहकार्य होईल असे वाटले आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच. बऱ्याचदा विवाहित तरुणाईला त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगावेसे वाटत असते , घरामध्ये स्वतंत्र स्थान / अधिकार हवे असतात , प्रायव्हसी हवी असते अर्थात यात गैर काहीच नाही. केवळ पती-पत्नी राहत असणाऱ्या स्वतंत्र कुटुंबामध्ये हे शक्य असतं. पण जिथे पती-पत्नी आणि सासू-सासरे एकत्र असतात तिथे मात्र यातील बऱ्याच गोष्टींवर मर्यादा येऊ लागतात ; यातूनच वादाच्या ठिणग्या पडू लागतात. घरात काही वस्तू विकत घ्यायची म्हटली तर सगळ्यांचीच मते मतांतरे घ्यावी लागतात. स्वयंपाक , सण-उत्सव आदी करण्याच्या पद्धतीमध्ये असणारे सूक्ष्म फरक लक्षात येऊ ला