Posts

Showing posts from December, 2021

वासुदेव हा वासुदेवच.....

Image
  गेले दोन - तीन दिवस झाले, सांता क्लोज नको वासुदेव हवा , लाल टोपी नको वासुदेवाची टोपी घाला, महाराष्ट्राचा हरवलेला सांता क्लोज म्हणजेच वासुदेव ..... अश्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वाचल्या.  खरं तर सांता क्लोज आणि वासुदेव यांची तुलना कधीच होऊ शकत नाही.  सांताच्या डोक्यावर टोपी आणि वासुदेवाच्या डोक्यावर पण टोपी म्हणून त्यांचा बादरायण संबंध जोडणे हे योग्य नाही.  सांता आणि भारतीय यांचा तसा सांस्कृतिक दृष्ट्या काहीही संबंध नाही, मुळात सांता क्लोज ही काही कुठली धार्मिक संकल्पना नाही. त्यात, कोणत्याही प्रकारचे ईश्वरीय अनुष्ठान नाही की; भक्तिमार्गाचे विवरण नाही.  युरोपियन चर्च मधून १८व्या शतकात केवळ ख्रिश्च्यानिटीचा प्रसार करण्यासाठी म्हणून, ख्रिसमसच्या निमित्ताने जगभर प्रसिद्धीस आणलेले पात्र म्हणजे हा सांता क्लॉस.   हां ! सांताचे; आपली खरी ओळख लपवून, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे; ही बाब उल्लखनीय असली तरी त्यात ईश्वरीय अनुष्ठान कुठेच नाही.  त्याच्या अगदी उलट; ईश्वरीय अधिष्ठान असणारा जनमानसातील एक म्हणजेच वासुदेव.  प्रापंचिकाला देवाचे नाव घेत काही तरी दान द्यायला शिकवणारा वासुदेव स

टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते

Image
  Image_Source कवी मनाचा राजकारणपटू म्हणजेच भारताचे दिवंगत पंतप्रधान, " भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी ".  त्यांची संघ स्वयंसेवक, संवेदनशील नेता, अजोड वक्ता, उत्तम संसदपटू अशी अनेक रूपे ही सर्वांनाच ज्ञात आहेत.  परंतु आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त ( २५ डिसेंबर ) आम्ही त्यांच्यातील उत्स्फूर्त कवी या पैलूचा आधार घेत; त्यांच्या फारश्या प्रचलित नसलेल्या पण, आम्हांस प्रेरणादायी  वाटलेल्या त्यांच्या दोन कविता आम्ही, वाचकां समोर मांडत आहोत.   १) टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते: सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, बऱ्याच प्रसंगातून जावे लागते, कधी मन उदास करणारे प्रसंग येतात तर कधी उद्वेग वाटावा असे प्रसंग येतात. जो सत्य आणि तत्वाच्या मार्गावर चालत असतो त्याला तर प्रसंगी सत्तेशी संघर्ष करावा लागतो.  असत्य आणि दमनशक्तीचा अंधकार तुमच्यातील उर्मीचा अंतिम  किरण सुद्धा झाकळण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा आपली तत्वे, ध्येय, धोरण यांच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी, संकटांच्या छाताडावर पाय रोवून, तुम्हाला गिळंकृत करू पाहणाऱ्या अंधकाररुपी  अजगराच्या पोटात शिरून, सर्व शक्तीनिशी त्याला फा