सिंहगड रस्ता परिसरात संपन्न होणार.. "रक्तदान महायज्ञ"
सिंहगड रस्ता परिसरात संपन्न होणार रक्तदान महायज्ञ रक्तदान शिबिराच्या प्रथम वर्षीचे संकलन २७६ एकक , दुसऱ्या वर्षीचे संकलन ५१६ एकक , तिसऱ्या वर्षीचे संकलन ११७७ एकक. हे आकडे कोणाही बड्या नेत्याने किंवा व्यावसायिकाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे नसून , विश्व हिंदू परिषद-बजरंग दल सिंहगड भागाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे. होय! विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग गेल्या तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते , भारतीय सैन्यातील हुतात्मा जवान आणि हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपल्या शहराची रक्ताची गरज भागविण्यात हातभार लागावा , तसेच शक्य तितक्या गरजू रुग्णांचे प्राण वाचावेत यां करीताच हा रक्तदान रुपी सेवायज्ञ चेतवला जातो , म्हणूनच या उपक्रमाला "रक्तदान महायज्ञ" असे नाव देण्यात आले आहे. मागील वर्षी एकाच दिवशी एकाच वेळी १५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ११७७ एकक रक्तसंकलन करण्यात यश मिळवले आहे. या उपक्रमाची दखल घेत , पुणे शहरातील रक्तदान क्षेत्रात महत्वाची कामगिर...