Posts

Showing posts from October, 2018

लोहपुरुष : सरदार वल्लभभाई पटेल

Image
लोहपुरुष : सरदार वल्लभभाई पटेल || जय जय रघुवीर समर्थ || आज ३१ ओक्टोबर ...... अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. भारताचे पहिले उपपंतप्रधान... स्वतंत्र भारताचे अखंडत्व जपणारे शिल्पकार ... हैद्राबाद, जुनागढ येथील मस्तवाल निजामाना धूळ चारुन ही संस्थाने भारतात समाविष्ट करणारे लोहपुरुष.... सोमनाथ मंदिर निर्माणसाठी संसदेमध्ये कायदा करावयास भाग पाडणारे संस्कृती रक्षक ...... पाकिस्तानच्या घशात जाउ घातलेले लक्षद्वीप बेट मोठ्या हुशारीने भारताला मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व......... अश्या एका बहुआयामी कणखर व्यक्तीमत्वास लक्ष लक्ष प्रणाम.  लोहपुरुष ना इन जैसा कोइ जो जोड सका हिंदुस्तानको, नमन करें इस सरदारको भारत के असली कप्तान को    || भारत माता की जय || श्रीपाद श्रीकांत रामदासी        धायरी पुणे ४१

डॉ.ए पी जे अब्दुल कलाम

                                                                     ।। जय रघुवीर ।। आज १५ ऑक्टोबर..... भारताचे माजी राष्ट्रपती महामहिम मिसाईलमॅन,  डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन. स्वतः एक वैज्ञानिक असूनही आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आणि मान्यता यांचा सदैव आदर करणारे एक महान देशभक्त अशी त्यांची ओळख सांगता येईल. डॉ. कलामानी जेंव्हा पहिले भारतीय बनावटीचे हावरक्राफ्ट बनवले तेंव्हा, त्याला 'नंदी' असे नाव दिले होते. त्याचप्रमाणे सर्वच क्षेपणास्त्राला देखील भारतीय संस्कृतीला साजेशीच नावे दिली आहेत, उदा. पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग आणि ब्रम्होस ई. डॉ. कलाम यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याकरता त्यांचे " विंग्स ऑफ फायर" हे आत्मचरित्र वाचावे, याचा मराठी अनुवाद " अग्निपंख " या नावाने प्रकाशित झालेला असून मूळ चरित्राचा अनुवाद, प्रा. माधुरी शानभाग यांनी केलेला आहे. हे चरित्र सतत काहीतरी सकारात्मक कार्य करण्यासाठी धडपडणार्यासाठी मार्गदर्शक ठरेल असेच आहे. त्यांच्या चरित्रातील एक वाक्य नेहमी मला स्फूर्ती देणारे आहे, त्या वाक्याचा आशय असा, " आपण

“ मी सिंहगड रस्ता बोलतोय ! ”

खमंग चिवडा या लेखनाचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नाही __________________________________________________________________________ “ मी सिंहगड रस्ता बोलतोय ! ” ©  श्रीपाद श्रीकांत रामदासी दचकलात का ?   रस्ता हा निर्जीव असतो मग तो बोलू कसा शकेल ? असा विज्ञानवादी प्रश्न आपणांस पडला असेल , पण पल्स पेक्षा इंपल्स वर जगणं शिकलं कि मग रस्तेच काय , जगातील कोणतीही चल-अचल , सचेतन-अचेतन , सजीव-निर्जीव वस्तू तुमच्याशी संवाद करू शकते. म्हणूनच इम्पल्स वर जगणाऱ्याना माझे बोलणे निश्चितच ऐकू येईल. सुमारे २१ किलोमीटरहुन अधिक लांबीचा डांबर , सिमेंट , खडी यांनी बनलेला मी सिंहगड रस्ता ,  सरकारी दरबारात , ' नरवीर तानाजी मालुसरे मार्ग ' असे माझ्या लांबीला शोभणारे लांबलचक  नांव असणारा एक पुणेरी रस्ता. माझे निश्चित वय मलाही आताशा आठवत नाही , खरे तर कोणत्याही रस्त्याचा जन्म हा त्याच्यावर जेंव्हा पहिला पथिक चालतो तेंव्हाच होतो. माझाही जन्म तसाच झालेला असावा. अर्थात तो पहिला पथिक कोण हे मलाही स्मरत नाही कारण आता तो इतिहास झाला आहे. इतिहासाचे पहिले पान प्रत्येकवेळी सा