स्वा.सावरकर ज्येष्ठ नागरीक संघ धायरी येथे झाले व्याख्यान

स्वा.सावरकर ज्येष्ठ नागरीक संघ धायरी येथे आज व्याख्यान झाले.
विषय होता " सावरकर समजून घेताना "

सर्व प्रथम पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले सैनिक, दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस, सिने नाट्य अभिनेते रमेश भाटकर यांना श्रद्धांजली वाहून, कार्यक्रमाची सुरुवात झाली.

साधारण पणे १२५ हून अधिक श्रोते होते....

यावेळेसचा विषय जरा वेगळा होता.... त्यामुळे केवळ सावरकर चरित्रातील घटना न सांगता गेल्या ३-४ वर्षांत घडलेल्या सामाजिक, राजकीय घटना, भारतावर झालेले दहशतवादी हल्ले, इ. विषयांचे संदर्भ देत, सावरकरांनी त्याबद्दल ८०-९० वर्षांपूर्वी मांडलेले विचार, त्यांच्या प्रत्येक कृती मागची
पार्श्वभूमी उलगडत ६०-७० मिनिटे
व्याख्यान चालले होते.

सावरकर आत्मार्पण निमित्ताने हे व्याख्यान असल्याने, सावरकरांचे प्रायोपवेशन, अंतयात्रा आणि त्यांच्या पश्चात आणि अगदी आजही सावरकरांची होत असलेली अवहेलना यावरही भाष्य केले.

सावरकरकरांचा अंतिम प्रवास सांगत असताना बऱ्याच श्रोत्यांना अश्रू अनावर झाले होते.....

खरं तर मलाही शेवटी शेवटी गहिवरून आले होते.....

व्याख्यान संपल्यावर काही क्षण शांतता होती आणि मग टाळ्यांचा गजर झाला.........

उत्तम श्रोते, सुंदर नियोजन आणि सावरकर भक्तीचा माहौल यामुळे मी स्वतः देखील भारावून गेलो होतो. काही अपरिहार्य कारणामुळे यंदाच्या वर्षी मी सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त कोणताही उपक्रम न करू शकल्याची, मनातील सल आजच्या व्याख्यानानंतर दूर झाली.

आयोजक आणि श्रोते मंडळी यांचे मन:पूर्वक आभार !!!

Comments