लेखक परिचय

 नमस्कार !

समस्त वाचकवृंदाना वंदन !!!

मी, श्रीपाद श्रीकांत रामदासी [ मेथवडेकर ], 

मूळचा सोलापूर येथील असून;  इ. स.  २००५ पासून, पुणे येथे वास्तव्यास आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. 

नक्षत्र नाट्य मंडळ सोलापूर या नाट्य संस्थेचा संस्थापक असून, नाट्यभिनेता, नाट्यदिग्दर्शनाचा अनुभव आहे.

गेली काही वर्षे सोलापूर, संभाजी नगर, पुणे,  आदी जिल्ह्यातून, छ. शिवराय, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, हिंदुत्व या विषयांवर व्याख्याने, भाषणे दिली आहेत; देत आहे.

मराठीसृष्टी, प्रगतिपर्व अश्या नियतकालिकांतून विविध विषयांवर लेखन देखील करत असतो. 

डॉ. आंबेडकर आणि स्वा. सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत, विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांवर भाष्य करणारे लेख सोशल मीडियावर, ब्लॉग वर लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न सुरु आहे.

माझे आत्तापर्यंत ५५ हुन अधिक लेख विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले असून ही संख्या  १०१  पर्यंत नेण्याचा मानस आहे. 

व्याख्याने, लेखमाला, याकरिता आपण मला इ-मेल द्वारे संपर्क करू शकता. 

इ-मेल : shripad.ramdasi [ at ] outlook [ डॉट ] [ कॉम ]

आमचे लेख, कविता याबद्दल आपला अभिप्राय अवश्य कळवावा. 

श्रीपाद श्रीकांत रामदासी 
           पुणे. 

Comments