Posts

Showing posts from July, 2021

..... अजब तुझे सरकार !

Image
  ।। राम कृष्ण हरी ।। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर, आळंदी, देहू आणि अन्य संत क्षेत्रांमध्ये येत असणाऱ्या  वारकरी मंडळींना सरकारी पातळीवर  त्रास देण्यात येत आहे.  खांद्यावरच्या भगव्या पताका काढून घेतल्या जात आहेत, पारंपरिक वारकरी वेष देखील काढण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे.  जे परकीय औरंगजेबाला जमले नाही, इंग्रजांना जमले नाही ते आमचे स्वकीय सरकार करून दाखवत आहे.   या सरकारी संकटाला नेमके आस्मानी म्हणावे की सुलतानी ? म्हणावे तेच कळत नाही.   आरोग्यविषय  सर्वप्रकारचे  निकष आणि नियम पाळून, वारी करण्यासाठी वारकऱ्यांनी केलेली मागणी देखील धुडकावून लावण्यात आली आहे.  एकादशीला संताच्या मांदियाळीने गजबजलेली पंढरी आज मात्र पाखंड्यांच्या मनमानी अधर्माने वेढली गेलेली पाहून मन हळहळते आहे. त्याच हळहळत्या मनातील भावना आज आपल्यापुढे मांडत आहे.  नाही यंदा दिंडी अन नाही वारकरी  सांग विठुराया; कशी घडावी तुझी वारी ।। धृ ।। चालली एकटी माउली; शल्य हे मनी विखारी  भक्ती विना जगती ते त्रैलोक्याचे भिखारी  ।। १ ।। येता चालत ओढत भक्त; दर्शना तुझ्या दारी खेचून ध्वजा  खांद्यावरची, छळती राजदरबारी ।। २

सागर-भेटीची १११ वर्षे : मार्सेलिस १९१०

Image
  ८ जुलै १९१० , ब्रिटिशांची एक नौका फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ येत होती. या नौकेमध्ये ब्रिटिशांचा एक कैदी   याच क्षणाची वाट पाहत होता. कैद्याला हवी असलेली वेळ आली आणि कैद्याने , स्वच्छता गृहात जाण्यासाठी आरक्षींची (पोलीस) परवानगी मागितली. आरक्षी त्याला स्वच्छता गृहात सोडून बाहेर पहारा देत उभे राहिले. हा कैदी   काही साधा-सुधा नव्हता , या कैद्यावर आरोप होते , राजद्रोहाचे , ब्रिटिशांविरुद्ध कारस्थान करण्याचे. हा कैदी भारतातून लंडनमध्ये बॅरिस्टर होण्याचे निमित्त करून शिकायला आला. तो इंग्लंड मध्ये येण्यापूर्वीच त्याच्या भारतातील कारवायांचा रिपोर्ट तिथे पोहोचला होता.   त्या कैद्याचा पूर्वेतिहास पाहून लंडन मध्ये पाय ठेवल्यापासून त्याच्या मागे ब्रिटिश गुप्तहेरांचा ससेमिरा लागला होता. पण तरीही हा कैदी बॉम्ब बनवण्याचा विधी भारतात पाठवण्यात यशस्वी झाला , या कैद्याने गुप्तपणे पिस्तुले देखील भारतात पाठवली होती. त्याने ब्रिटिशांचा याहुन एक भयंकर गुन्हा केला होता , तो म्हणजे लंडन मधील इंग्रजाळलेल्या सुखलोलुप भारतीय तरुणांच्या मनात स्वराष्ट्रभक्ती जागृत करून बंडखोरांची एक टोळीच त्याने लंडनम