लॉकडाऊन ऍट सोलापुर .....
एक सोलापुरी संवाद (संपूर्णपणे काल्पनिक) मन्या : (मोबाईल वरील कॉल उचलत) ... हां बोल बे चन्या .... सक्काळ सक्काळ फोन केला ? चन्या : (फोनवरूनच ) का कराला ?? मन्या : का कराव... बसलो घरी गुमान ... काम ना धंधा बोल गोविंदा अशी कंडिशन झाली बग .... चन्या : हां बे माज बी तसंच झालय बे ... भाईर जावं तर पोलीस हंतेत बे धरून ... आमच्या बाजूचा बंड्या हाय ना ? मन्या : ते काळ्या तोंडाचं ढापणं ? चन्या : हां तेनीच बे ... तेला सांगायलेत सगळे, नको जाऊ बे... नको जाऊ बे.. भायेर .. पन खाज बे बुडाला .... गेला बग चौकात ... अरे बाप रे असा हाणले बे पोलीस .... कुत्र्यागत हाणले बे ... आता झाली का मज्जा .... भायेर फिरायला बी येईना आनी एवढा सुजवलेत .... की घरी बूड टेकून बसता बी यीना... मन्या : म्हनून म्हनतो पोलिसांचं ऐकावं बे... ... तेनी तरी किती सांगावं बे समजून ... लोकं बी येड्या डोक्याचेत ... मग काय करावं तेनी .... देतेत फटके रप्प किनी ... चन्...