Posts

Showing posts from May, 2021

सावरकर एक दीपस्तंभ : भाग ५ वा.

Image
                                                                    अमरवंश सावरकर  गांधी हत्या अभियोगातून निर्दोष आणि निष्कलंक मुक्तता झाल्यावर सावरकर प्रकृती स्वाथ्यासाठी बंगलोरला काहीदिवस राहून आले. तदनंतर त्यांनी पुन्हा कार्यास आरंभ केला पण पुढच्या काही महिन्यातच , १९ ऑक्टो १९४९ रोजी , नारायण सावरकरांचा मृत्यू झाला.   हा प्रसंग सावरकरांच्या मनाला चटका लावणारा होता ; " तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू " असा बंधुत्वाचा संदेश समाजाला देणाऱ्या सावरकरांच्या बंधूला , मात्र समाजकंटकांनी ठेचून ठेचून मारले. सावरकरांचे दोन्हीही बंधू कालवश झाले होते सावरकरांचे मन त्यावेळेस विच्छिन्न झाले होते परंतु   समाजाचे दुःख संपवण्यासाठी जगणाऱ्या महापुरुषांना स्वतः ची वैयक्तिक सुखेच नव्हे तर दुःखेदेखील बाजूला सारूनच मार्ग क्रमावा लागतो. सावरकरांच्या अंदमान सुटकेसाठी जर कोणी जीवाचा आटापिटा केला असेल तर तो नारायणरावांनीच. बाबाराव-तात्याराव यांच्या प्रमाणेच नारायणरावांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान हे अमूल्यच आहे परंतु कालानुरूप आज नारायणरावांची विस्मृती झालेली दिसते. गांधीहत्या अभियोगा

सावरकर एक दीपस्तंभ : भाग ४ था.

Image
                  फाळणी, गांधी हत्या आणि सावरकर   १६ जुलै १९४४ रोजी काँग्रेस नेते रामजींनी गांधीजींच्या अनुमतीने काढलेल्या पत्रकात , मुस्लिम लीगच्या सर्व मागण्या मान्य करून पाकिस्तानच्या निर्मितीला मान्यता दिली. या पत्रकामध्ये हि मान्यता दोन वर्षांपूर्वीच दिली गेली आहे   असेही नमूद करण्यात आले होते. सावरकर आणि हिंदुमहासभेने या फाळणीला तीव्र विरोध केला ; एवढेच नव्हे तर काही राष्ट्रवादी काँग्रेसजनांनी देखील फाळणीला विरोध केला होता. फाळणीला विरोध करण्यासाठी पाच हजार सभा झाल्या , पन्नास हजार स्वाक्षऱ्या गोळा केल्या गेल्या परंतु चर्चा मात्र थांबलीच नाही. फाळणीला झालेला विरोध पाहता , जनतेला हि फाळणी मान्यच नव्हती असेच वाटते , परंतु जिना जिंकले आणि सामान्य जनता मात्र हरली. १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने भीषण दंगली घडवल्या , निरपराध हिंदूंचे डोळे फोडले, हिंदूंची घरे , मालमत्ता यांची राजरोस पणे लूट झाली , लक्षावधी हिंदूंची कत्तल झाली आणि धर्मान्तरे झाली. हा सरळ सरळ अन्याय होता , अनीती होती , मानव्याची क्रूर चेष्टा होती , राष्ट्रवादाचा घोर अवमान होता. परंतु काँग्रेस , समाजवादी आ