Posts

श्री शिवराजाभिषेक [ Coronation ceremony of Shivaji Maharaj ]

Image
  मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अनेक अपूर्व अश्या घटना , प्रसंग घडले आहेत . त्यातील अत्यंत महत्वाची आणि कालातीत घटना म्हणजे , श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हि होय . वास्तवात एखाद्या राजाचा राज्याभिषेक होणे हा प्रसंग जरी तत्कालीन समाज पद्धतीनुसार सामान्य असला तरी , छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही घटना किंवा प्रसंग हा असामान्य होती असेच आम्हांस वाटते . एखादी घटना जेंव्हा असामान्य म्हणून गणली जाते , तेंव्हा त्या घटनेचे पूर्वरंग आणि परिणाम हे दूरगामी असतात . श्री शिवराज्याभिषेकाचे देखील तसेच आहे . शिवाजी महाराजांचे राज्य हे काही वंश परंपरेने चालत आलेले किंवा वारसा हक्काने प्राप्त झालेले राज्य नव्हते . शिवाजी महाराजांचे राज्य , स्व - धर्म , स्व - संस्कृती , स्व - भाषा यांचा स्वाभिमान तथा अवलंब असणारे स्व - राज्य होते . शिवरायांच्या जन्मापूर्वीची भारतीयांची परिस्थिती अत्यंत दयनीय तसेच परकीय आक्रमक आणि राज्यकर्ते यांच्या अत्याचाराखाली भरडली ज

मुक्त चिंतन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Image
  सर्वप्रथम आमच्या समस्त वाचकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनेक शुभेच्छा ! परिस्थितीची अनुकूलता आणि प्रतिकूलता या मानवी आयुष्याच्या महत्वाचा घटक आहेत. बरेचजण अश्या प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबुद्ध होतात आणि परिस्थितीला शरण जातात. महाकाय प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय रोवून जे स्वतःचे तेज प्रकट करू शकतात ते आणि तेच या समाजाचा उद्धार करू शकतात.  पण असे करण्याकरता विलक्षण मनःसामर्थ्य आणि झुंझार मनोवृत्ती असावी लागते त्याशिवाय संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होत नाही.  अश्याच झुंझार व्यक्तिमत्वातील एक अग्रणी नाव म्हणजे, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे होय.  शूद्रातिशूद्र समजल्या गेलेल्या आणि हजारो वर्षांच्या अन्यायाने भरडून निघालेल्या, सदैव आर्थिक सामाजिक आणि धार्मिक मागासलेपणाचा मानवनिर्मित शाप लाभलेल्या ज्ञातीमध्ये जन्म घेतलेले डॉ.आंबेडकर जेंव्हा विश्ववंदनीय ठरतात तेंव्हा त्याला चमत्कार म्हणावे असे वाटते. पण हा काही कपोलकल्पित जादूची कांडी फिरवून घडलेला चमत्कार नव्हता तर त्यामागे कठोर, खडतर अशी तपश्चर्या होती. समाजाचा उद्धार करण्याकरता स्वतःच्या आयुष्याचा केलेला तो होम होता.  डॉ.आंबेडकर

शुभ सकाळ (उत्तरार्ध )

   ........ डॉ. राकेशने तात्काळ आपली बॅग उचलली आणि निसरड्या वाटेवरून झपाझप पावले टाकीत, काहीसे धापा टाकतच रंगरावांच्या घरी पोहोचले, तपासणी करताना लक्षात आले की हा सौम्य हृदयविकाराचा झटका आहे. अश्या रुग्णांना आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध नव्हती, आणि तालुक्याहुन ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्याची शक्यता पण कमी होती .... त्यांनी सांगितले की; " मोठ्या गाडीची करावी लागेल, यांना तालुक्याला न्यावे लागेल .... " खरं तर हे सांगितल्यावर स्वतः डॉक्टरांनाच कसे तरी वाटले; कारण पुरात गावातल्या बहुतेक गाड्या खराब झाल्या होत्या... नाही म्हणायला प्रतापरावांची   गाडी तेव्हढी वाचली होती.... प्रतापराव आणि रंगराव यांचं वैर तर जगजाहीर होते, त्यातून नुकतीच त्यांच्यातली झालेली चढाओढ याने तर दोघांतील दुहीचा कळसच गाठला होता. अश्या परिस्थितीत प्रतापरावांकडे रंगरावांसाठी मदत मागायची म्हणजे, मदत मागणाऱ्याचीच कत्तल होती. निळकंठ म्हणाला " डॉक्टर...   प्रतापरावांशिवाय कुणाचीच गाडी न्हाय आता .... कसं करावं म्हंता ? " डॉ. राकेश म्हणाले " प्रतापरावांकडे या कामासाठी जायचे म्हणजे ये रे ये

शुभ सकाळ (पूर्वार्ध)

Image
  छायाचित्र : इंटरनेटवरून साभार.  चंद्रमुखी नदीच्या तीरावर वसलेली दोन गावे, कोळसेवाडी आणि चंदनवाडी. खरं तर एका आख्यायिकेनुसार ही दोन्ही गावं एकच होती. चंदनवाडी असंच त्याचं नावं. चंदनाच्या महावृक्षांचे गर्द जंगल असल्यानं त्या गावाचं नाव चंदनवाडी पडलं होतं. कोण्या एका ऋषींच्या शापाने किंवा कोपानं ते जंगल भस्म झालं. भस्म झालेला भाग पुढे कोळसेवाडी म्हणून ओळखला जाऊ लागला.   आजही ती जमीन अगदीच बरड आहे. पण चंदनवाडीची जमीन मात्र चांगलीच कसदार आहे. सत्पुरुषांचे आशिर्वाद जितके मंगलदायी असतात तितकेच त्यांचे शाप दुःखदायी असतात. त्या आख्यायिकेवर विश्वास जरी नाही ठेवला तरीही, एकाच नदीच्या दोन्ही तीरावर जमिनीतला हा फरक हे सुद्धा आश्चर्यच म्हणावे लागेल. चंदनवाडीच्या दोन्ही अंगाला मोकळी पांढरीची मैदाने, एका मैदानात गावदेवीचे मंदिर तर दुसऱ्या मैदानात शंभू शंकराचे; त्याच्या पुढे टेकड्याची पठारे. गावाच्या पुढे असणाऱ्या मोकळ्या जागेत बाजार पटांगण तिथेच जत्रा भरत असे. बाजाराच्या पलीकडे नदी. मुळात दक्षिण वाहिनी असणारी नदी गाव संपता संपता तिच्या उजव्या अंगाला वळसा देऊन, नैऋत्य वाहिनी होत होती. तिच्या अश्य