गांधी - सावरकर - गांधी
गांधी - सावरकर - गांधी © श्रीपाद श्रीकांत रामदासी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना , बापूजींचे पणतू ‘ तुषार गांधी ’ यांनी " बापूजींच्या हत्येमागे सावरकर हेच होते " असे विधान केल्याचे ३१ डिसेम्बर २०१८ रोजी , महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांतून आम्ही वाचले [ या वृत्ताची प्रत , संदर्भासाठी राखून ठेवलेली आहे ] गांधीजींची झालेली हत्या , ही दुःखदायकच होती यात दुमत नाही , परंतु त्या हत्येमध्ये वीर सावरकरांचे नाव विनाकारण गोवणे हे तेंव्हाही आणि आत्ताही , दुर्दैवीच आहे असे माझे स्पष्ट मत आहे. खरे तर गांधी हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग असण्याचे कोणतेच कारण नाही , किंवा सावरकरांना गांधीहत्या व्हावी असे वाटण्याचे कारणच काय ? सावरकर आपल्या भाषणांतून , लेखनातून गांधीजींवर टीका करत होते , हे तर जगजाहीरच आहे. सावरकर आणि गांधीजी यांच्यातील वैचारिक विरोध हे काही लपून राहिले नव्हते , त्याचप्रमाणे गांधीजींवर टीका करणारे सावरकर हे काही एकटेच नव्हते. समकालीन नेते नव्हते , सावरकरांना जसे गांधींजींचे अति अहिंसेचे , मुस्लिम लांगूलचालनाचे वर्तन मान्य नव्हते , त्याच प्रमाणे डॉ.