शिवजातस्य संभाजी महाराज : उत्तरार्ध
छायाचित्र श्रेय : श्रीपाद श्रीकांत रामदासी शिवरायांसी आठवावे , जीवित तृणवत मानावे ।। इहलोकी परलोकी उरावे , कीर्ती रूपे ।। या लेखांच्या पूर्वार्धातून, छ. संभाजी महाराजांची जडण घडण कशी झाली ? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व काय ? याबाबत माहिती पहिली. या भागामधून संभाजी राजांची छत्रपती , स्वराज्य रक्षक म्हणून कशी कारकीर्द होती या बाबत माहिती घेणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती , धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न …. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी राजांनी स्वतःस (राजा या भूमिकेतून ) केंद्र स्थानी ठेऊन , अष्टप्रधान मंडळाची रचना तशीच चालू ठेवली होती . स्वराज्याची महसूल व्यवस्था प्रांत रचना , न्याय व्यवस्था , मुलकी कारभाराच्या व्यवस्था , देशमुख-देशकुलकर्णी यांचे अधिकार आदी बाबी तश्याच पुढे चालू ठेवल्या होत्या. इंग्रज-पोर्तुगीज-डच आदी व्यापारी मंडळींसोबत असणारे करार-मदार देखील तसेच पुढे चालू ठेवले होते. संभाजीराजांनी एकाच वेळी अनेक शत्रूंशी झुंज देत , स्वराज्याचे रक्षण केले आणि विस्तारही केला हे सर्वश्रुत आहेच. परंतु कल्याणकारी राजां