शुभ सकाळ (पूर्वार्ध)
छायाचित्र : इंटरनेटवरून साभार. चंद्रमुखी नदीच्या तीरावर वसलेली दोन गावे, कोळसेवाडी आणि चंदनवाडी. खरं तर एका आख्यायिकेनुसार ही दोन्ही गावं एकच होती. चंदनवाडी असंच त्याचं नावं. चंदनाच्या महावृक्षांचे गर्द जंगल असल्यानं त्या गावाचं नाव चंदनवाडी पडलं होतं. कोण्या एका ऋषींच्या शापाने किंवा कोपानं ते जंगल भस्म झालं. भस्म झालेला भाग पुढे कोळसेवाडी म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही ती जमीन अगदीच बरड आहे. पण चंदनवाडीची जमीन मात्र चांगलीच कसदार आहे. सत्पुरुषांचे आशिर्वाद जितके मंगलदायी असतात तितकेच त्यांचे शाप दुःखदायी असतात. त्या आख्यायिकेवर विश्वास जरी नाही ठेवला तरीही, एकाच नदीच्या दोन्ही तीरावर जमिनीतला हा फरक हे सुद्धा आश्चर्यच म्हणावे लागेल. चंदनवाडीच्या दोन्ही अंगाला मोकळी पांढरीची मैदाने, एका मैदानात गावदेवीचे मंदिर तर दुसऱ्या मैदानात शंभू शंकराचे; त्याच्या पुढे टेकड्याची पठारे. गावाच्या पुढे असणाऱ्या मोकळ्या जागेत बाजार पटांगण तिथेच जत्रा भरत असे. बाजाराच्या पलीकडे नदी. मुळात दक्षिण वाहिनी असणारी नदी गाव संपता संपता तिच्या उजव्या अंगाला वळसा देऊन, नैऋत्य वाहिनी होत होत...