समग्र रामदास ऍप


" समग्र रामदास ऍप "

समर्थ श्रीरामदासस्वामींच्या समग्र वाङ्मयाचा समावेश असणारे App

......जय जय रघुवीर समर्थ !!

समर्थभक्त सज्जनहो,

राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदासस्वामी महाराज !
सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रदेशात नवचेतना निर्माण करणारे एक अलौकिक, अद्भुत आणि अद्वितीय संत !

बालवयातच विश्वाच्या चिंतेने व्याकूळ झालेल्या आणि अवघ्या बाराव्या वर्षीच ऐहिक सुखाचा त्याग करून श्रीरामरायाच्या अोढीने बाहेर पडलेल्या श्रीसमर्थांनी पुढे बारा वर्षे तपश्चर्या - पुरश्चरण करून श्रीरामाला प्रसन्न केले. तीर्थाटनातून हिंदुस्थानातील परकीय सावटाची जाणीव होताच संघटन करून कित्येक समाजविधायक कार्ये समर्थांनी केली. धार्मिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक इत्यादी सर्वच विषयांवर समर्थांनी चोख व आजच्या भाषेत सांगायचे तर अतिशय विज्ञानवादी मार्गदर्शन त्याकाळातच करून ठेवलेले आहे.

काय त्यांची क्रांतदर्शी प्रतिभा ! आपल्या विपुल अशा वाङ्मयामधून आध्यात्मिकासोबतच व्यावहारिक विषयांवर समर्थांनी मांडलेले  विचार आजही जसेच्या तसे उपयोगी पडणारे आहेत. कारण तेच शाश्वत आहेत !

आजच्या प्रगत काळाची गरज ओळखून, समर्थांचा हा प्रगल्भ वाङ्मयसंभार सोबतच्या लिंकवरील ऍपच्या माध्यमातून जगभरातील वाचक-अभ्यासकांसाठी आम्ही प्रेमपूर्वक सादर करत आहोत. या 'समर्थ' वाङ्मयाच्या वाचन-मननाने व चिंतनाने आपल्याही आयुष्याला सुख-समाधानाची सुयोग्य दिशा मिळो व सर्वांच्या जीवनाचा महोत्सवच साजरा होवो हीच मन:पूर्वक शुभेच्छा !

हे विनामूल्य उपलब्ध झालेले अनमोल शब्दधन आपल्या सर्व परिचितांनाही आवर्जून पाठवावे या प्रेमळ आग्रहासह, तुम्हां सर्वांना पुनश्च एकवार 'जयजय रघुवीर समर्थ' !

https://play.google.com/store/apps/details?id=com.shrisamarthavatar


टिप:
ही माहिती केवळ प्रचार सेवा करणे साठी प्रसारीत केली असून या ऍप चे सर्व श्रेय,
ऍप निर्मात्यांना आहे. 

Comments