सावरकर एक दीपस्तंभ : भाग २ रा.


हिंदू सुधारक सावरकर


सत्य आणि न्याय्य परंतु परखड विचार हीच सावरकरांच्या विचारधारेची ओळख आहे. सावरकर हे केवळ भाषणबाजी किंवा खर्डेखाशी करणारे बोलभांड सुधारक नव्हतेत्यांच्याकडे जशी वैचारिक बैठक होती तशीच कार्यतत्परता आणि सकारात्मक आचारशीलता देखील होती.

सावरकरांनी चालवलेली अस्पृश्योद्धार चळवळ हि केवळ वृत्तपत्रे किंवा साप्ताहिकांतील लेखमालेपुरती मर्यादित कधीच नव्हतीदलितांच्या शाळा प्रवेशाप्रमाणेच मंदिर प्रवेशासाठी सावरकरांनी दंड थोपटले.

तो काळ असा होता की काही कर्मठ धर्मांधांना, दलितवर्गाची सावली देखील हीन वाटत होती.

दलितांच्या केवळ दर्शन घेण्यानेदेवाला विटाळ होतो असे मानवतेच्या शत्रूंचे मत होते. अश्या मतिमंद

कर्मठ धर्मांधांना, सावरकरांनी ठणकावून सांगितले किज्याला विटाळ होतो तो देवच नाही."

आपल्या चळवळीबद्दल सांगताना सावरकर सांगत असत कि,

माणसाच्या केवळ दर्शनानेस्पर्शाने विटाळ होतो असे जे मानतातते स्वतःच मानवजातीवरचे कलंक आहेत. वस्तुतः तेच स्वतः पतित आहेतखरा विटाळ ह्या असल्यांच्या स्पर्शाने झाला पाहिजे."

अस्पृश्यता निवारणाने केवळ अस्पृश्यांचा उद्धार होणार आहे असे नव्हेतर असे सन्मार्गभ्रष्ट कर्मठ स्पृश्यही यामुळे शुद्ध होणार आहेत. तेही उद्धरून जाणार आहेत. "

१९२९ साली रत्नागिरीच्या विठोबा मंदिरात अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाबाबत सभा भरली होतीसुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारीही स्वतः उपस्थित होते. सभेच्या प्रारंभीच सावरकरांनी अस्पृश्यांची बाजू इतक्या प्रभावी आणि बिनतोडपणे मांडली किकर्मठ धर्मांधांची बाजू ऐकून घेण्याचे भान कोणालाच राहिले नाहीआसमंत दुमदुमून टाकणारा आणि कर्मठ धर्मांधांच्या कानाचे पडदे फाडणाऱ्या जयजयकारातच उपस्थित अस्पृश्यानी मंदिरात प्रवेश केलाहिंदुधर्माला अस्पृश्यतेचे असलेले युगायुगांचे सुतक फिटले, वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवाला भक्तांचे दर्शन घडलेतो प्रसंग साऱ्यांनाच भावूक करणारा होतात्यामुळे या घटनेला विरोध तर दूरच पण साधा निषेध करण्याचेही भान उपस्थित कर्मठ धर्मांध आणि अधिकाऱ्यांना राहिले नाही. हा मंदिर प्रवेश हिंदूंच्या दिग्विजयाची गाथा सांगत देशभरच नव्हे तर लंडन पर्यंत गाजला.

आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी एकेकाळी भगीरथाने स्वर्गस्थ गंगा पृथ्वीवर आणली होती त्याच प्रमाणाने अखिल हिंदूंचा उद्धार करण्यासाठी सावरकरांनी समतेची पतित पावन गंगा रत्नागिरीमध्ये आणली. सावरकर त्या युगातले भगीरथ ठरले.

या घटनेनंतररात्नागीरी आणि परिसरातील ५०० हुन अधिक मंदिरामधून दलितांना निर्वेध प्रवेश मिळाला.

हिंदू समाजातील स्पृश्य-अस्पृश्य स्त्रियांचे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलेसावरकरांच्या सौभाग्यवतींनी देखील पुढाकार घेत आपल्याच घरामध्ये अखिल हिंदू हळदी-कुंकू समारंभ केला.

हे सर्व घडत असताना सावरकरांना एक कल्पना सुचली ती म्हणजे की एका अश्या मंदिराची निर्मिती करणे,

ज्यामध्ये हिंदू समाजातील सर्व जाती वर्णाला प्रारंभी पासूनच मुक्त प्रवेश असेल. तेथील पौराहित्यावर कोणाही एका विशिष्ठ जातीवर्गाचा अधिकार नसेलतिथे कोणताही हिंदू निर्वेध पूजा करू शकेल.

सावरकर म्हणजे केवळ कल्पना विलासी नेते नव्हते, त्यांनी हा विचार सहकार्यात रुजवून मंदिराचे काम सुरु केले. १९३१ च्या सुमारास मंदिराचे निर्माण पूर्ण झालेहिंदू ऐक्याच्या मंत्रघोषानेपतित हिंदूंना पावन करणाऱ्या या मंदीराचे  पतित पावन मंदिर " असे नामकरण करण्यात आले.

आजही गेली ९० वर्षे हे मंदिर हिंदू संघटक सावरकरांच्या कार्याची साक्ष देत तेवढ्याच दिमाखात आणि पावित्र्यात उभे आहेत. पुढच्या काळामध्ये याच मंदिरामध्ये कित्येकदा महार परिषदअस्पृश्यता निवारण सभा आदि कार्यक्रम यथासांग पार पाडले.

या मंदिर निर्माणासोबतच सावरकरांनी अस्पृश्याना वेदोक्ताचा अधिकार दिलादलितांची मौजीबंधने करून जानवी वाटप करण्यात आली. जातीतील भेद आणि भिंती पाडून टाकण्यासाठी सावरकरांनी सहभोजनाचे अगणित कार्यक्रम केलेआंतर जातीय विवाहांना प्राधान्य दिलेजर एखाद्या आंतर जातीय विवाहाला पुरोहित मिळत नसेल तरसावरकर स्वतः चे त्या विवाहाचे पुरोहित्य करीत.

सावरकरांच्या कार्य कस्तुरीचा सुगंध देशभर पसरत होताडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सावर्जकरांचे खास

पत्र पाठवून विशेष कौतुक केले. बऱ्याच आंदोलनामध्ये डॉ. आंबेडकारांच्या पाठीशी मजबूत संघटन घेऊन

उभे राहणारे जर कोणी असतील तर ते सावरकरच होते ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.

सावरकरांवर केवळ आंबेडकरांचाच नव्हे तरकर्मवीर शिंदेडॉ. मुंजेडॉ. राजभोजठाकूर चंदनसिंग यांसारख्या

दिग्गजांच्या आणि जनाधार असणाऱ्या समाजनेत्यांचा पूर्ण विश्वास होता. यापैकी डॉ. मुंजेंसारख्या जनमान्य नेत्याने तर स्वतःचे उर्वरित आयुष्यही सावरकरांना मिळावे अशी मनोकामना जाहीरपणे बोलून दाखवली.

२६ एप्रिल १९३१ या दिवशी रत्नागिरी जिल्हा सोमवंशीय महार परिषद भरली होतीया परिषदेचे अध्यक्ष सावरकरच होते. या परिषदेमध्ये कर्मवीर शिंदेंच्या दलित वर्ग मिशनचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित देखील उपस्थित होते.

सावरकरी चळवळीने केलेली कामगिरी पाहून ते समाधानी झाले, " सावरकरांनी आमचे स्वप्न रत्नागिरीत साकार करून दाखवले " असे कृतज्ञ उदगारहि त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले.

महार परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात सावरकरांनी दलितांनास्वच्छताआरोग्यनिर्व्यसनीपणा यांचे महत्व सांगितले त्याचप्रमाणे जर कोणी तुमचा रस्ता अडवला तर त्याला ठणकावून बजावून बाजूला सारण्याचा संदेश दिला. सावरकरांच्या या संदेशालाडॉ. आंबेडकरांच्या " जनता " या पत्राने पाठिंबा दिला, पुढे काही दिवसांनी जेंव्हा डॉ. आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी नासिक मध्ये मंदिर प्रवेशाची चळवळ सुरु केली तेंव्हा सावरकरांनी स्वतः पत्रके काढून डॉ.आंबेडकरांना पाठिंबा दिला, ही पत्रके भाऊराव गायकवाडांनी नासिकच्या सवर्ण समाजामध्ये वाटली.

धर्मान्तरणाच्या घोषणे नंतरसावरकर-आंबेडकर यांमध्ये टिकायुद्ध झालेपरंतु तेही तेवढ्यापुरतेच. त्यानंतरच्या काळातही हे दोन्ही महामानव परस्परांना सहकार्यच करत राहिले. परंतु अलीकडच्या काळात मात्र या दोनही समाजनेत्यांचे अनुयायी मात्र एकमेकांचा द्वेष करताना दिसतातहेच या महामानवांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

सावरकरांच्या स्थानबद्धतेमध्ये घडलेले हे रत्नागिरी पर्वहिंदू समाजाला सप्तबंदीमधून मुक्त करणारे समाज क्रांती पर्व ठरले. सावरकरांनी आपल्या चळवळीचाकार्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी व्यासपीठवृत्तपत्रेपरीक्षा-केंद्रेनाट्यगृहेसर्कशीचे तंबूउत्सव समारंभजत्रा या व अश्या अनेक माध्यमांचा यशस्वी उपयोग करून घेतला.

सावरकरचरित्रातील आणखीन एक महत्वाची बाब म्हणजेयाच कालावधीमध्ये सावरकरांनी साहित्याचा हिमालय उभा करून ठेवला.

या कालावधीमध्ये सावरकरांनी३ नाटके लिहिली आणि रंगभूमीवर आणलीत्यातील उ:शाप हे नाटक अस्पृश्योद्धारावर आधारित आहे.

संन्यस्त खङग हे सावरकरांचे दुसरे नाटकया मध्ये अहिंसा हा सद्गुण म्हणून ठीक आहे परंतु राष्ट्रकारणामध्ये मात्र प्रसंगीशत्रू हिंसेचा अवलंब करावा लागतो असा संदेश देणारी कथा आहे.

सावरकरांचे तिसरे नाटक म्हणजे उत्तरक्रिया ', या मध्ये पानिपतानंतरचा मराठी काळ मांडण्यात आला असूनया नाटकामधली एक म्हातारी पेशव्यांना उत्तरेकडे आक्रमण करून पुन्हा मराठी झेंडा अटकेपार नेण्याचे सांगते तो प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे.

मोपलयांचे बंड ', ' काळे पाणी या कादंबऱ्यारानफुले हा काव्यसंग्रह म्हणजे सावरकरांनी मराठी साहित्यविश्वाला दिलेली अमूल्य भेटच आहे.  

सावरकरांचे लेखन हे अर्थातच वाङ्मयप्रचुर होतेदुर्लभ अशी वृत्तेछंद तसेच स्वतः निर्माण केलेल्या वैनायक या वृत्तामधील काव्ये ही अद्वितीयच आहेत.

सावरकरांच्या साहित्यामध्ये कालिदास - व्यासांची भव्यता होतीसमर्थांची दिव्यता होती,

ज्ञानेश्वर-तुकोबाराय यांची सामाजिक कळकळ होतीबहिणाबाईंची आर्तता होती तर कृष्ण नीतीचे कालातीत तत्वज्ञान होते.

याच कालावधीमध्ये सावरकरांनीभाषाशुद्धीवरही भर दिलाअनेक इंग्रजीउर्दूफारसी शब्दांना पर्यायी,

नवे अर्थ पूर्ण मराठी शब्द दिले.

राष्ट्राची भाषा हिन्दी असली तरी तिची लिपी देवनागरीच हवी हा आग्रह सावरकरांचाच होता.

सावरकरांनी साहित्य निर्मितीचा वापर हा केवळ चळवळीला पूरक वातावरण निर्मितीसाठीच केला.

त्यातून त्यांना स्वतः ला काहीच द्रव्य लाभ झाला नाहीत्यांनी कधीही कमाईच्या उद्देशाने साहित्य निर्मिती केली नाही.

मना चंदनाचे परी त्वा झिजावेपरी अंतरी सज्जना नीववावे " हे समर्थ वचन सार्थ करीतच सावरकरांनी रत्नागिरी स्थानबद्धतेची तब्बल १४ वर्षेआपली अस्पृश्योद्धाराची चळवळ नेटाने चालवली.

अखेर १० मे १९३७ म्हणजेच १८५७ चे स्वातंत्र्यसमर ज्या दिवशी सुरु झाले त्याच दिनांकाला सावरकरांची मुक्तता झाली.

एक गरुड अखेर पारध्याच्या जाळ्यातून संपूर्णतः मुक्त झाला आकाशात उंच भरारी घेण्यासाठी .....


Comments

Suhas Ingle said…
थोर माणूस,माहितीबद्दल धन्यवाद श्रीपाद.👌👍
छान ओघ आहे लेखात. व नवीन ज्ञानही.