कोथरूड ( पुणे ) येथे " शिवचरित्र कथन " उत्साहात सादर.

 



मा. आमदार श्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या संकल्पनेतून, भारतीय जनता पक्ष, सांस्कृतिक आघाडी (कोथरूड मतदार संघ)  आयोजित,  " सांघिक किल्ले बनवा " स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात, " शिवचरित्र कथन " सादर करण्याची संधी मिळाली. 

प्रारंभी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, यांनी अफझल खानाचा वध, हा पोवाडा सादर केला. 

त्यानंतर, गोष्टीरूपी शिवचरित्र कथन करण्यासाठी मी उभा राहिलो. खरं तर लहान मुले, त्यांचे पालक आणि राजकीय मंडळी अश्या तिहेरी प्रकारच्या श्रोत्यांसमोर एकाच वेळी शिवचरित्र कथन करणे हे एक आव्हानच होते. पण प्रारंभी आदिशक्ती तुळजाभवानी आणि छ. शिवरायांना मनोमन वंदन करून 

" पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की ...... " अशी घोषणा दिली; उत्साहाने भरलेल्या प्रतीसादाने माझा आत्मविश्वास वाढवला. 

मग थोड्या गमती जमती करत, बाळ गोपाळांना हसवत हळू हळू शिवचरित्र मांडायला सुरुवात केली. 

माँसाहेब जिजाऊ आणि बाल शिवबा यांचे पुण्यात झालेले आगमन, स्वराज्याची शपथ अश्या कथा सांगून अखेर शिवराज्याभिषेक सोहळा या प्रसंगाचे वर्णन करून, शिवचरित्र कथन पूर्ण केले. 

उत्साहाने भरलेली बाल मंडळी, तरुण व्यवसायिक आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 

एका बलाढ्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असणारे आदरणीय श्री. चंद्रकांतदादा, एखाद्या रसिक श्रोत्याप्रमाणे शिवचरित्र ऐकत होते, दाद देत होते, ही बाब उल्लेखनीय आहे. 

बालगोपालांकडून उत्साहाची शिदोरी घेऊनच मी घरी आलो. 




Comments