हिंदूंपुढील आव्हाने : भाग २ : एकसंघतेचा आभाव.


 

सद्यस्थिती मध्ये, जरा डोळे उघडे ठेवून पहिले तर, या देशातील बहुसंख्यांक असणाऱ्या हिंदू समाजापुढील काही प्रश्नांचे आकलन होते. 

अर्थात बहुतेक हिंदूंना या बाबी;  " प्रश्न " किंवा " आव्हाने " या सदरात मोडतात याची जाणीव देखील नाही. हिंदू समाजात; एक हिंदू म्हणून वावरताना जाणवलेल्या बाबी आणि आमच्या अल्प, स्वल्प मतीनुसार त्यावरील तोडगे हे आम्ही या लेखामालेद्वारे मांडत आहोत. अर्थात हेच एक अंतिम सत्य आहे असा आमचा दावा नाही. आम्हांस जाणवलेल्या, उमगलेल्या आव्हानांची शिदोरी आम्ही वाचंकांपुढे उघडत आहोत तथापि त्यात असणाऱ्या चुका, उणिवा दाखवून दिल्यास आम्ही त्या विनम्रपणे स्वीकारून त्यावर नक्कीच विचार करू. 

मध्यंतरी इंटरनेटवर एक व्हिडीओ पाहिला, त्यामध्ये ८-१० लांडगे एका सिंहावर हल्ला करत असतात, त्याच वेळी तिथे थोड्या अंतरावर एक दुसरा सिंह उभा असतो. तो हे सगळं पाहतो आणि थोड्या वेळाने तिथून शांतपणे निघून जातो. एकसाथ आलेल्या ८-१० लांडग्यांशी झुंझ देऊन सिंह दमतो आणि पाहता पाहता ते लांडगे, सिंहाचा फडशा पाडतात. तात्पर्य काय ? तर त्या दुसऱ्या सिंहाने संकटात सापडलेल्या सिंहाच्या नुसते बाजूला जरी उभे राहिले असते तर, लांडगे पळून गेले असते. आज हिंदूंची स्थिती ही एकटं पडलेल्या सिंहासारखी झाली आहे. 

जोपर्यंत मला झळ बसत नाही तो पर्यंत मी शेजारच्या घराची आग विझवायला जाणार नाही अशी काहीशी वृत्ती हिंदू समाजात वाढत असल्याचे जाणवते. आणखी एक नेहमी दिसणारे चित्र आठवून पहा, रस्त्याने जाताना जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला जर कोणी चुकून धडक मारली किंवा अन्य कोणत्याही कारणाने त्याच्याशी गैर मुस्लिम व्यक्तीने बाचा बाची केली तर, तिथे आजूबाजूला असणारे सर्व मुस्लिम लगेचच आपल्या धर्मबांधवाच्या बाजूने उभे राहतात. त्यांना परस्परांची ओळख असणे गरजेची वाटत नाही. एखादा मुस्लिम जर संकटात असेल मग भलेही तो स्वतः च्या चुकीने असेल, सगळा समाज त्याच्या मागे उभा राहतो. परंतु हेच एखाद्या हिंदू बाबत घडलं तर सगळ्यात आधी त्याची भाषा काय ? मुख्य म्हणजे जात काय ? वगैरे वगैरे बघून मग ठरवलं जातं की; त्याला मदत करायची की नाही. तो पर्यंत बिचारा मार खाऊन अर्धमेला झालेला असेल.... 

हे एकीकडे असे आहे तर, दुसरीकडे हिंदूंची काही सुखस्वप्ने अजून संपलेली नाहीत. उदा. आम्ही हिंदू किती शूर आहोत याचे इतिहासात दाखले आहेत, आमच्या छत्रपतींनी अफझल खान कसा फाडला होता, पृथ्वीराज कसे शूरवीर होते, त्यामुळे जर वेळ पडलीच तर आम्ही समोरच्याशी दोन हात करायला तयार आहोत. वगैरे वगैरे.... परंतु हिंदूंनो आता युद्ध केवळ खुल्या रणांगणात नाहीये तर, ते कायद्याच्या चौकटीत आहे. 

आता त्या वक्फ कायदा दुरुस्तीचेच पहा ना !

सरकारी भूखंड, सार्वजनिक मालमत्ता; मोगलाई कायद्याने वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावाने करून टाकायची आणि याला न्यायालयात देखील दाद नाही. मग हिंदूने करायचे काय ? हिंदूंच्या मंदिरावर देखील असाच दावा ठोकून ती जमीन हडपल्याचा प्रकार नुकताच एके ठिकाणी घडला. आत्ताच्या केंद्र सरकारने या असल्या एककलली कायद्यात दुरुस्ती सुचवली परंतु ते बिल अडकले बहुमताच्या कचाट्यात. आता त्यावर हरकती किंवा अभिप्राय मागवण्यात आला आहे. 

आत्तापर्यंत एका वेबसाईट नुसार, ९० लाख मुस्लिमांनी दुरुस्तीला विरोध दाखवला सुद्धा  हिंदू अजूनही पाठवू का नको पाठवू हा विचार करत बसलाय. 

अरे बंधुनो ! हिंदू आहात ना !! मग !!!, तुमच्या विरोधात असणारा कायदा रद्द करा असा जोर धरायला घाबरताय का ? आणि कोणाला ? 

देशातल्या समस्त हिंदूंनी एकत्र येऊन जर हा कायदा रद्द करण्याची मागणी केली तर हा कायदा शिल्लकच राहणार नाही, पण एकत्र येऊन हा विरोध करणार कोण ? आणखी एक, नुकतेच एका महाभागाने प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधाने केली. प्रत्येक गुरुवारी न चुकता स्वामींची आरती करणारा हिंदू आज साधा निषेध देखील करत नाहीये ..... का बरे ? 

हिंदूंच्या दैवतांबद्दल, साधू संतांबद्दल काहीही बोला, लाव जिहादच्या जाळ्यात कितीही हिंदू मुली अडकवा, झुंडशाही करून हिंदू वस्त्यांमध्ये दहशत पसरावा किंवा हिंदू सोबत कसे हि वागा हिंदू गप्प बसणार....  कारण हिंदू  एकसंध समाज म्हणून जगतच नाही. कधी भाषा, कधी प्रांत, जात अश्याच माध्यमातून एक हिंदू दुसऱ्या हिंदूकडे बघतो.

आमचे हिंदू बंधू भगिनींना हेच सांगणे आहे की, हिंदू कडे केवळ हिंदू म्हणूनच बघा, तुम्हाला काफिर म्हणण्यासाठी तुमची जात काय हे महत्वाचे नसून तुम्ही  हिंदू आहात एवढेच महत्वाचे आहे. जर अहिंदू तुमच्यात भेद करत नाहीत तर तुम्ही स्वतः मध्ये का भेद करता. लक्षात ठेवा, इतिहास साक्ष आहे अहिंदूंच्या रक्षणासाठी हिंदू नेहमीच पुढे आला आहे पण हिंदूंच्या रक्षणासाठी कधीही कोणीही अहिंदू पुढे आला नाही. 

पानिपताचेच उदाहरण घ्या ना ! 

दिल्लीच्या मुस्लिम बादशहाला वाचवण्यासाठी हिंदू मराठे इथून गेले परंतु, तिथे जवळ असणारे कडवट मुस्लिम नबाब मात्र आपल्या धर्मबंधूला जाऊन मिळाले. 

त्यावेळेस जर उत्तरेतल्या सर्वच हिंदू राजांनी मराठ्यांना साथ दिली असती तर दिल्लीवर भगवा तेंव्हाच फडकला असता. असो इतिहासाची मढी उकरून काढण्यात काही अर्थ नाही. वर्तमानात जेंव्हा जेंव्हा हिंदुहितासाठी आवश्यक असते तेंव्हा कोणीही कथित अहिंदू सेक्युलर पुढे येत नाही पण अहिंदूंसाठी आमच्यातलेच काही बांडगुळं लाल सतरंज्या टाकून उभ्या राहतात. हे चित्र कधी बदलणार का नाही हाच एक प्रश्न आहे. 

कदाचित यामुळेच, हिंदू बहुसंख्य असणाऱ्या राष्ट्रामध्ये,  हिंदुद्वेष करणारा पक्ष ६० वर्षे राज्य करून गेला. या पेक्षा हिंदूंच्या बाबतीत दैवदुर्विलास तो काय म्हणायचं. 

म्हणूनच म्हणतो हिंदूंनो जागृत व्हा, भलेही तुम्हाला प्रथम आक्रमणाची सवय नसेल पण म्हणून प्रत्याघाताचे बळ तरी घालवू नका. एका हिंदूला झालेला त्रास हा समस्त हिंदुसमाजाला झालेला त्रास आहे तेंव्हा आणि तेंव्हाच हिंदू एक महाबलाढ्य शक्ती म्हणून उदयास येईल. 

लहानपणी ऐकलेली, मोलाची गोष्ट नेहमी स्मरणात ठेवा आणि अवघा हिंदू एकची आहे हे ब्रिदवाक्य आपल्या मनात ठसवा... 

जय श्रीराम !

Comments

Samyak Sadhana said…
जुनाट व ज्वलंत समस्या मांडल्याबद्दल धन्यवाद. याचं मूळ कशात आहे? याचा उहापोह व्हावा, त्यावर उपाय केला की समस्या सुटू लागेल.
Samyak Sadhana said…
पुढील लेखाची वाट पाहतो आहे.