Posts

Showing posts from September, 2024

हिंदूंपुढील आव्हाने : भाग २ : एकसंघतेचा आभाव.

Image
PC   सद्यस्थिती मध्ये, जरा डोळे उघडे ठेवून पहिले तर, या देशातील बहुसंख्यांक असणाऱ्या हिंदू समाजापुढील काही प्रश्नांचे आकलन होते.  अर्थात बहुतेक हिंदूंना या बाबी;  " प्रश्न " किंवा " आव्हाने " या सदरात मोडतात याची जाणीव देखील नाही. हिंदू समाजात; एक हिंदू म्हणून वावरताना जाणवलेल्या बाबी आणि आमच्या अल्प, स्वल्प मतीनुसार त्यावरील तोडगे हे आम्ही या लेखामालेद्वारे मांडत आहोत. अर्थात हेच एक अंतिम सत्य आहे असा आमचा दावा नाही. आम्हांस जाणवलेल्या, उमगलेल्या आव्हानांची शिदोरी आम्ही वाचंकांपुढे उघडत आहोत तथापि त्यात असणाऱ्या चुका, उणिवा दाखवून दिल्यास आम्ही त्या विनम्रपणे स्वीकारून त्यावर नक्कीच विचार करू.  मध्यंतरी इंटरनेटवर एक व्हिडीओ पाहिला, त्यामध्ये ८-१० लांडगे एका सिंहावर हल्ला करत असतात, त्याच वेळी तिथे थोड्या अंतरावर एक दुसरा सिंह उभा असतो. तो हे सगळं पाहतो आणि थोड्या वेळाने तिथून शांतपणे निघून जातो. एकसाथ आलेल्या ८-१० लांडग्यांशी झुंझ देऊन सिंह दमतो आणि पाहता पाहता ते लांडगे, सिंहाचा फडशा पाडतात. तात्पर्य काय ? तर त्या दुसऱ्या सिंहाने संकटात सापडलेल्या सिंहाच्या नुसते