Posts

Showing posts from 2020

स्वदेशीला राजाश्रय हवाच !

Image
  [दै. प्रभात (पुणे शहर आवृत्ती) १७-१०-२०२०] नमस्कार ! आज दै. प्रभात (पुणे शहर आवृत्ती ) मधील,  चीन मधून ए. सी. आयात करण्यावर बंदी घालण्याच्या, केंद्र सरकारच्या निर्णया संदर्भातली बातमी वाचली.  केंद्र सरकारने देशी उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असेही समजले.  हा निर्णय वाचून, एका शिवकालीन ऐतिहासिक संदर्भाची आठवण झाली.  १६७१ साली, कोकण किनारपट्टीवर बारदेशातून आणलेले मीठ विकले जात असे. ते मीठ देशी मिठागरातील मिठापेक्षा स्वस्त असल्याने, त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असे. पर्यायाने देशी मीठ तसेच पडून राहून देशी व्यापाऱ्यांचे नुकसान होत असे.  हि बाब महाराजांना समजताच, त्यांनी आपल्या कुडाळच्या सरसुभेदारांस बारदेशातून येणाऱ्या मिठावर जबर जकात बसवण्याची आज्ञा केली.  महाराजांनी स्पष्टपणे लिहिले की; ही जकात इतकी जबर असावी की काही झाले तरी बारदेशचे मीठ हे देशी मिठापेक्षा खूपच महाग झाले पाहिजे. महाराज लिहितात ;  " ..... बारदेशात मीठ विकते, त्याने कितेक जबर पडते, ते मनास आणून त्या अजमासें जकात जबर बैसवणे की संगमेश्वरी विकतें आणि घाटपावेतो जे बेरीज पडेल त्या हिशेबी बारद

महालेखक : डॉ.धनंजय कीर

Image
डॉ.धनंजय कीर चांगले चरित्र जगणे हे जसे कठीण असते तसेच थोर पुरुषांची चरित्रे उत्तमरीतीने लिहिणे हे देखील मोठे जिकिरीचे आणि जबाबदारीचे कार्य असते. या दोनही गोष्टी ज्या काही थोड्याफार भारतीय चरित्रकारांनी जपल्या आहेत त्यातील एक अग्रणी म्हणजे डॉ.धनंजय कीर . रत्नागिरीच्या खडपे वाठारांत २३ एप्रिल १९१३ रोजी , धनंजय कीर यांचा जन्म वडील विठ्ठल आणि आई देवकी यांच्या पोटी झाला. धनंजय कीर हे रत्नागिरीच्या दक्षिणेस तीन -साडेतीन किलोमीटरवर असणाऱ्या जुवे बेटावरील श्रीमंत अश्या गोविंद कीर यांच्या भंडारी कुळात त्यांचा जन्मलेले. गोविंद कीर हे त्यांचे पणजोबा होत. धनंजय कीर जरी श्रीमंत कुटुंबात जन्मले असले तरी स्थलकाल परत्वे त्यांच्यापिढीपर्यंत ही श्रीमंती टिकली नाही. त्यांचे वडील सुतारकाम व ड्रॉईंग ची कामे करत असत. त्यांना सगळे कीर मिस्त्री असे म्हणत असत. वयाच्या सहाव्या वर्षी धनंजय कीर हे देखील चित्रशाळेमध्ये , ड्रॉईंग आणि सुतारकाम करण्यासाठी जात असत. कीरांच्या लहानपणी घरची परिस्थिती बेताचीच असे परंतु तशाही परिस्थिती ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.  खरे तर कीरांचा आणि शालेय

लॉकडाऊन ऍट सोलापुर .....

Image
एक  सोलापुरी संवाद   (संपूर्णपणे काल्पनिक) मन्या : (मोबाईल वरील कॉल उचलत) ... हां बोल बे चन्या .... सक्काळ सक्काळ फोन केला ? चन्या : (फोनवरूनच ) का कराला ?? मन्या : का कराव... बसलो घरी गुमान ... काम ना धंधा बोल गोविंदा अशी कंडिशन झाली बग .... चन्या : हां बे माज बी तसंच झालय बे ... भाईर जावं तर पोलीस हंतेत बे धरून ... आमच्या बाजूचा बंड्या हाय ना ? मन्या : ते काळ्या तोंडाचं ढापणं ? चन्या : हां तेनीच बे ... तेला सांगायलेत सगळे, नको जाऊ बे...  नको जाऊ बे.. भायेर .. पन खाज बे बुडाला ....           गेला बग चौकात ... अरे बाप रे असा हाणले बे पोलीस .... कुत्र्यागत हाणले बे ... आता झाली का मज्जा ....           भायेर फिरायला बी येईना आनी एवढा सुजवलेत .... की घरी बूड टेकून बसता बी यीना... मन्या : म्हनून म्हनतो  पोलिसांचं ऐकावं बे... ... तेनी तरी किती सांगावं बे समजून  ...           लोकं बी येड्या डोक्याचेत ... मग काय करावं तेनी .... देतेत फटके रप्प किनी ... चन्या : पोलिसांचं सोड बे सवता साठी तर घरी बसाव बे गप ....  ते कोरोना वायरस लै डेंजरय बे .... बिना मास्कच दि

सावध रहा राजा... आठवडा वैऱ्याचा आहे.

Image
हिंदुस्थानसह  देशामध्ये कोरोना विषाणूने घातलेला धुमाकूळ सर्वश्रुतच आहे. हिंदुस्थानमध्ये अनेक बाधित रुग्ण नोंदवले गेले आहेत. संशयितांचा आकडा याहून अधिक असायची शक्यता आहे गेल्या पंधरवाड्यामध्ये  हे प्रमाण वाढले आहे. कालचा जनता कर्फ्यू जरी यशस्वी झाला असला तरी जनता कर्फ्यू औषध नाही. आज सकाळपासून बरेच नागरिक हे सोसायटी, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे येथे सर्रास वावरताना दिसत आहेत. अत्यावश्यक बाबींकरिता फिरणे मान्य आहे, परंतु अश्यावेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क किंवा रुमाल वापरणे हे अनिवार्य आहे हे विसरून चालणार नाही. आज इटली, चीन या देशातील नागरिकांनी वेळीच आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेतली असती तर आज त्या देशांमध्ये मृत्यूने एवढे थैमान घातले नसते. सध्या चीन आणि इटलीच्या शासनाच्या नावाने खडेफोड करणारे सोशल मिडिया वीर स्वतः जबाबदारी पार पाडतायत का हे त्यांनी आत्मपरीक्षण करून पहावे. हिंदुस्थान आणि महाराष्ट्र शासन त्यांचे कार्य करतेच आहे, आता काही जण त्यावरही टीका टिंगल करताना दिसत आहेत, काही जण क्रेडिट वॉर खेळताना दिसत आहेत, पण बंधुनो जर प्रशासन कमी पडत

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !

Image
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला © श्रीपाद श्रीकांत रामदासी अंजन कांचन करवंदी तर कधी गडकोटांच्या चिरेबंदी यांनी संपन्न असणारा एक मंगलदायी प्रदेश म्हणजे; तुमचा आमचा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा इतिहासाकडे अगदी सहज दृष्टी टाकली तर विविध क्षेत्रातल्या विविध परंपरांचे दर्शन घडते. या अनेक परंपरांमधील एक परंपरा म्हणजे संत परंपरा. महाराष्ट्रामध्ये अलौकिक असे अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला दिलेले आहे. संतांनी प्रबोधनाद्वारे निर्माण केलेल्या ज्ञानमंदिराच्या ओवरीवर आजही मराठी माणूस नतमस्तक होतो आणि अडचणीच्या काळामध्ये संतवचनांचे स्मरण करत मार्ग काढतो. या ज्ञानमंदिराकडे भक्तिमय मनःचक्षूंनी पाहिल्यावर समजतं की या ज्ञानमंदिराचा पाया माउली ज्ञानेश्वरांनी रचला, संत नामदेवादी संत सज्जनांनी त्याच्या भिंती उभारल्या तर जगतगुरु संत तुकाराम त्याचा कळस ठरले. थोडे आणखी पुढे जाऊन पाहिल्यास त्या कळसावर एक पताका फडकताना दिसते, त्या पताकेचा मंजुळ स्वर अस्पष्ट ऐकू येतो.... आणखी पुढे गेल्यावर त्या स्वराचे शब्द ऐकू येतात ..... गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ..... म