Posts

Showing posts from April, 2021

एकमेका सहाय्य करू !

Image
  जय श्रीराम ! संतांची, समाजसेवकांची भूमी अशी शेकडो वर्षांची ओळख असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. सद्यस्थिती मध्ये, कोरोना विषाणूच्या प्रसार विस्फोटामुळे याच भूमीवर संकटांचे कृष्ण-मेघ दाटले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे हे आपण, बातम्या आणि अन्य माध्यमांतून पाहतच आहोत. तूर्तास केवळ पुणे शहराचा विचार केल्यास, कालचा (०८-०४-२०२१) आकडा, एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३१२३८२ तर एकूण डिस्चार्ज २५७८३३ इतका आहे. ही आकडेवारी देण्याचा उद्देश एवढाच की, कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्या देखील बरीच मोठी आहे हे समजावे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना, कोरोनाची दाहकता कमी करण्याची एक उपयुक्त पद्धत म्हणजे प्लाझ्मा थेरपी. हा प्लाझ्मा काही प्रयोग शाळेत किंवा कोणत्या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात तयार होणार नाही, तर तो समाजातील (वैद्यकीयदृष्ट्या पात्र) दात्यांच्या प्लाझ्मा दानातून उपलब्ध होणार आहे. कोरोना लागण होऊन बरे झालेला व्यक्ती आपला प्लाझ्मा दान करू शकतो (अर्थात याला अन्य वैद्यकीय निकष देखील आहेत. ). एक सर्वसाधारण विचार केल्यास, प्लाझ्मादान करणाऱ्यांची संख्या