Posts

Showing posts from April, 2024

मुक्त चिंतन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Image
  सर्वप्रथम आमच्या समस्त वाचकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनेक शुभेच्छा ! परिस्थितीची अनुकूलता आणि प्रतिकूलता या मानवी आयुष्याच्या महत्वाचा घटक आहेत. बरेचजण अश्या प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबुद्ध होतात आणि परिस्थितीला शरण जातात. महाकाय प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय रोवून जे स्वतःचे तेज प्रकट करू शकतात ते आणि तेच या समाजाचा उद्धार करू शकतात.  पण असे करण्याकरता विलक्षण मनःसामर्थ्य आणि झुंझार मनोवृत्ती असावी लागते त्याशिवाय संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होत नाही.  अश्याच झुंझार व्यक्तिमत्वातील एक अग्रणी नाव म्हणजे, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे होय.  शूद्रातिशूद्र समजल्या गेलेल्या आणि हजारो वर्षांच्या अन्यायाने भरडून निघालेल्या, सदैव आर्थिक सामाजिक आणि धार्मिक मागासलेपणाचा मानवनिर्मित शाप लाभलेल्या ज्ञातीमध्ये जन्म घेतलेले डॉ.आंबेडकर जेंव्हा विश्ववंदनीय ठरतात तेंव्हा त्याला चमत्कार म्हणावे असे वाटते. पण हा काही कपोलकल्पित जादूची कांडी फिरवून घडलेला चमत्कार नव्हता तर त्यामागे कठोर, खडतर अशी तपश्चर्या होती. समाजाचा उद्धार करण्याकरता स्वतःच्या आयुष्याचा केलेला तो होम होता.  डॉ.आंबेडकर