Posts

Showing posts from July, 2018

विनम्र आवाहन !!!

।। जय जय रघुवीर समर्थ ।। सप्रेम नमस्कार !!! श्री आत्माराम महाराज कृत श्रीरामदासपंथक्रमसार या 102 वर्षापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या  ग्रंथाचे प्रकाशन  सत्कार्योत्तेजक सभा धुळे तर्फे 24 जून 2018 रोजी धुळे येथे झाले. धुळे  येथील श्री सत्कार्योत्तेजक सभा आणि श्री समर्थ वाग्देवता मंदिर या दोन्ही  संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या  या समर्थ  सेवेचे खरोखर च कौतुक  करावेसे वाटते. श्री रामदासपंथक्रमसार हा श्री आत्माराम महाराज एक्केहाळीकर यांचा ग्रंथ  म्हणजे प्रत्येक रामदासी  सांप्रदायिकासाठी एक आदर्श  आचार्य संहिता सांगणारा ग्रंथ  आहे. फक्त 16 अध्याय आणि 548 ओव्या असणा-या या ग्रंथाची " सारांचेही सार " ही अप्रतिम  प्रस्तावना  समर्थ ह्रदय श्री नानासाहेब देव धुळे यांनी लिहिलेली आहे . या ग्रंथाची किंमत  फक्त रू 50/- आहे.  आपण इतर सांप्रदायिक  व्यक्ती आणि  इतरांना  हा अमूल्य  ग्रंथ  भेट म्हणून  पण देऊन समर्थ  विचारांचा  प्रचार करू शकता. श्री सत्कार्योत्तेजक सभा/ श्री समर्थ वाग्देवता मंदिर यांचा संपर्क  क्रमांक  खाली स्वतंत्रपणे देत आहे. टिप:

आज गुरू पौर्णिमा.....

|| जय श्रीराम || समर्पण, त्याग आणि शौर्य यांची शिकवण देणारा परम पवित्र भगवा ध्वज . योग आणि सामर्थ्य यांच्या द्वारे समाजसेवा शिकवणारे सद्गुरू नवनाथ.  चळवळीचे सामर्थ्य शिकवणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी.   धर्मासाठी झुंझावे   ही शिकवण ज्यांच्या चरीत्रातुन मिळते असे, छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज . परिवर्तन, परिस्थितीला शरण जाऊन नाही तर तिच्यावर आक्रमण करून घडते अशी शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा.तात्याराव सावरकर.   वेळोवेळी मार्गदर्शन करणारे कुटुंबिय, व्यवसायीक, समाजबांधव, संघटन सहकारी  आणि मित्रपरिवार यांना  गुरूपौर्णिमे निमित्त त्रिवार वंदन . श्रीपाद श्रीकांत रामदासी  

चिऊ ताईचा संदेश ......

चिऊ ताईचा संदेश ......  © श्रीपाद श्रीकांत रामदासी घनदाट सुंदर बहरलेली, असे एक वनराई, जो जे वांछील तो ते मिळवी, उणे नसेच काही....  वटवृक्ष, आम्रपल्लव, पिंपळ, कुठे चाफा अन जाई  केसरी करी गर्जना कोकीळ मंजुळ गाई ...  पशु पक्षी सौख्ये नांदती गोड मधुर फळे ती खाई  दाट सावली पाहुनी अंती सुखासीन ते होऊन जाई  एक दिनू उगमे भयंकर वडवानल तो पेटत जाई  जे जे येती मार्गावर ते ते भस्म करीत जाई  पक्षी घाबरे प्राणी बावरे कळेना कोणास काही  कसे वाचावे अग्नीतून या सुचेना कोणास काही  प्राणी धावे ठाई ठाई पक्षीही उडून जाई  क्षणार्धात ती वनराई धगधता अग्निकल्लोळ होई  एक उठे गोंडस चिऊताई, तीही म्हणे कोठे ना जाई  घर हे माझे हि वनराई त्यांसी वाचवून करेन उतराई  पुकारे व्याघ्रास, कधी गजास, कधी पुकारे पक्षीराजास  कोणी ना येई कामकाजास, जो तो धावे स्वतः वाचण्यांस  मग करुनी विचार चिऊताई, गाठी पाणवठा घाई घाई  धरोनी जलकण चोची ठाई, वृक्षावरी ओतून  देई  पुन्हा पुन्हा धावे घाई घाई, एक एक जलकण ओतून  देई  पाहुनी तिजला पशु पक्षि ते, म्हणे अगं ए वेडाबाई  च

जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ वारी पंढरीची ...

Image
जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ   वारी पंढरीची ...  © श्रीपाद श्रीकांत रामदासी छायाचित्र साभार -- गुगल सर्च इंजिन कालपासून पंढरीच्या वारीचा सोहळा सुरु झाला..... खरंच काय गूढ आहे या वारीमध्ये ? ...... शतकानुशतके कोणीही ना आमंत्रण पत्रिका छापते, ना कुणी कोणाला वारीमध्ये सामील होण्याचे आवाहन करते, ना कोणाला सामील होण्याचे  मानधन मिळते,  तरीही बरोबर ज्या त्या तिथीला, जो तो आपापल्या दिंडीसोबत हजर. वारी .....  या दोन अक्षरांमध्ये एवढी जबरदस्त शक्ती आहे कि केवळ या दोन शब्दांचा महामंत्र, लाखो भाविकांना शेकडो किलोमीटर चालण्याची ऊर्जा देतो. जात, पंथ,वर्ण, वंश, आपले समाजातील स्थान, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक प्रश्न, हे सगळे आपोआप बाजूला सारून वारकरी अखंड चालत असतो, विठू नामाचा गजर करीत असतो. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात " विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ " म्हणूनच भेदभाव विसरून एक होणे म्हणजे नेमके काय ते वारीतच कळते, समरसता प्रत्यक्षात उतरते ती इथेच. मला पोटाला अन्न मिळेल का ? झोपायला जागा मिळेल का ? परगावात माझे कसे होईल ? पाऊस आला तर कस
आपले पाल्य सुरक्षित आहेत का ?  © श्रीपाद श्रीकांत रामदासी   सकाळची गडबडीची वेळ, ज्याला त्याला ऑफिस गाठायची घाई. अशाच वेळी दळवीवाडी फाटा येथे घडलेली ही घटना. दळवीवाडी कडून नांदेड कडे जाणाऱ्या वळणावरून निघालो होतो, नेहमीप्रमाणे वाहतूक अडखळत चालू होती येवढ्यात किरकिटवाडी कडुन एक भरधाव वॅन आली आणि एका दुचाकीस्वाराला जोरात धडकली. यांची धडक होणार हे लक्षात आल्या आल्या माझ्यासह आणखी काहीजणानी व्हॅनला थांबवण्यासाठी आरडा ओरडा केला परंतू व्हॅन काही थांबली नाही. नशीबाने दुचाकीस्वाराच्या अंगावर जर्किन आणि डोक्यावर हेल्मेट होते म्हणून त्याला काही फारशी इजा झाली नाही. त्या व्हॅन जवळ गेल्यावर लक्षात आले की ती व्हॅन विद्यार्थी वाहतूक करणारी व्हॅन होती. चालकाने सिट बेल्ट लावला नव्हता. त्याला बेदरकार गाडी चालवण्याचा जाब विचारला तर उलट उत्तरे ठरलेली...... उपस्थितांपैकी काही जणानी त्याला खाली उतरायला सांगितले पण गाडी बाजूला घेण्याच्या बहाण्याने तो पळून गेला. त्या व्हॅनच्या बाबतीत जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे ती व्हॅन पांढरी होती आणि नंबरप्लेट पण पांढरी काळी होती. म्हणजे ती काही प्रवासी