Posts

एक श्रीमंत कलादृष्टी : शिवसृष्टी ! शिवसृष्टी !!

Image
  आज सहकुटुंब आंबेगाव येथील शिवसृष्टी अनुभवली. होय अनुभवलीच म्हणावे लागेल कारण तिथे जे काही निर्माण केले गेले आहे ते अनुभवावेच लागते त्याला पहिले, बघितले अश्या शब्दात बांधता येत नाही.  भव्य असे प्रवेशद्वार, त्याला दिंडी दरवाजा. आतील रचना देखील ऐतिहासीक प्रकारच्या वाड्याचीच.  दगडी कारंजे, ओवऱ्या मोठाल्या पायऱ्या, उबंरठे अगदी कित्येक वर्षे जुनी वाटावी अशीच वास्तू.  पण ही रचना जरी ऐतिहासिक प्रकारची असली तरी, आतील तंत्रज्ञान मात्र अत्याधुनिक पद्धतीचे आणि निदान मला तरी नवखे.  शिवसृष्टीचे प्रत्येक दालन म्हणजे जणू इतिहासाचे हळुवार उलगडणारे पानचं, ऐतिहासिक शस्त्रे, काहीं शस्त्रांच्या प्रतिकृती, इतिहासातील व्यक्तींची अस्सल चित्रे, महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती, राज्याभिषेक समयी असणारी चिन्हे, आग्र्याहून सुटकेचा आणि अफझल खान वधाचा थरार प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना अगदी आपण प्रत्यक्षदर्शीच आहोत असेच वाटते. एकंदरीत चित्रे, शस्त्रे प्रतिकृती पाहता हे एखादे पारंपरिक वस्तुसंग्रहालय आहे का ? असे वाचकांस वाटेल परंतु ते तसे नाही.  येथे आपण काही नुसते बघत नाही, तर प्रत्येक बाबीची काटेकोर माहिती, मावळे आ

अनंतवंशज मेथवडेकर - रामदासी

जय जय रघुवीर समर्थ ! काल देशभरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.  जागो जागी श्रीराम प्रतिमा स्थापून सार्वजनिक स्वरूपामध्ये देखील हा उत्सव साजरा झाला.  श्री समर्थ संप्रदायात, श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा आहे. संप्रदायातील अनेक घराण्यांपैकी एक घराणे म्हणजे, सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या सांगोला तालुक्यातील मेथवडे येथील श्री अनंत महाराज  यांचे मेथवडेकर घराणे.  सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या कृपाछत्राची दिक्षा प्राप्त असणारे मेथवडेकर; समर्थ कालापासून श्रीराम नवमीचा उत्सव करत आले आहेत.  सद्यस्थितीमध्ये तब्बल १३ वी पिढी कार्यरत असूनही, हा उत्सव आजही कुटुंबातील प्रत्येक घरी होत आहे.  यंदाच्या वर्षी, हाती आलेल्या माहिती नुसार; मेथवडे, तळेगांव दाभाडे, वारजे माळवाडी, सांगली, लोटेवाडी, धायरी, विठ्ठलवाडी, वाकड, पंढरपूर, बाणेर येथील  मेथवडेकरांच्या विविध घरांमध्ये हा उत्सव पार पडला.  या उत्सवात स्थानिक सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील शेकडो रामभक्तांनी उपस्थिती लावली.  सांप्रदायिक पद्धतीने उपासना, रामनामावली, गुलाल आणि पाळणा असे रामजन्मोत्सवाचे स्वरूप असते.   ३०० वर्षाहून अधिक व

हिंदू ऐक्याची विजयादशमी साजरी करूया !

Image
इतिहासामध्ये सत्याचा असत्यावर , सद्प्रवृत्तीचा खलप्रवृत्तीवर झालेलया विजयाचे प्रतिक म्हणजे विजयादशमी . हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांमधून विजयादशमीची असलेली वर्णने ही , नीतीचा अनीतीवर होणाऱ्या विजयाचे प्रतिक अश्या संदर्भात आलेली आहेत . विजयादशमी या सणाला , दसरा असेही म्हणतात हे सर्वश्रुतच आहे , याच दिवशी सीमोल्लंघन करायची परंपरा आपल्याकडे आहे . तसेच विजयादशमीच्या आदल्यादिवशी म्हणजे नवमीला असणारी शस्त्रपूजनाची परंपरा देखील आहे . आजच्या काळात या सणांचे महत्व हे केवळ धार्मिक ग्रंथांमधून सांगितलेल्या कथा , घटना यांचे स्मरण करण्या पुरते मर्यादित नाही ; तर हे सण एक प्रेरणा आहेत असे मला वाटते . सद्यस्थितीत हिंदू समाजाने , या सण उत्सवांमधून घेण्याची प्रेरणा , या बद्दल या लेखामध्ये आम्ही काही विचार मांडत आहोत . एकंदरीतच घडणाऱ्या घटना, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता, हिंदू समाजामध्ये , जात , पंथ , प्रांत , भाषा अश्या अनेक बाबींवरून परस्पर द्वेष भावना उत्पन्न करण्याचे कुटील कारस्थान ; काही समाजघट

आपली मातृभूमी

Image
  ऑगस्ट महिना हा प्रत्येक भारतीयांसाठी विशेष असतो कारण याच महिन्यात आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो .  यंदाचा स्वातंत्र्यदिन हा आपल्या सर्वांसाठी अधिकच विशेष आहे , कारण स्वातंत्र्याची पंचाहत्तरी या वर्षी पूर्ण झाली आहे . १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत इंग्रज राजवटीपासून मुक्त झाला असला तरी या देशाचे , राष्ट्राचे अस्तित्व फार फार पुरातन आहे . आपण प्रत्येकजणच या देशाला केवळ आखीव सिमा असणारा एक भूपृष्ठ भाग न मानता , आपली माता मानतो . आपल्या देशाच्या नावातच ( भारत ) हे राष्ट्र आपली माता असल्याचे स्पष्ट होते . आपल्याकडे एखाद्या स्त्रीला आदराने हाक मारताना , तिच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावानेच संबोधले जाते . उदा . श्याम ची आई , रमाची आई वगैरे वगैरे . स्त्रीची ओळख करून देताना , सौभाग्यवती अमुक तमुक हे संबोधन पाश्चिमात्य संस्कृतीत वापरले जाते परंतु आपल्याकडे मात्र तिच्या अपत्यांच्या नावानेच हाक मारली जाते . फार फार पूर्वी आपल्याकडे भरत नावाचा एक पुण्यशील राजा होऊन गेला ह