शाळेची शाळा !
राज्य सरकारने काढलेल्या फतव्या नुसार; १ ली ते ४ थी च्या शाळा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हे कदाचित योग्यही असेल; परंतु हे असे करणे किती संयुक्तिक आणि सहज आहे याचा देखील विचार झाला पाहिजे. शाळा संचालक, पालक आणि विद्यार्थी यांच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींचा विचार या लेखाद्वारे मांडत आहोत. टाळेबंदीच्या काळामध्ये, अनेक शाळांना निधी अभावी, हंगामी शिक्षक, सेवक यांना कमी करावे लागले आहे. आता शाळा सुरु झाल्याबरोबर त्यांची व्यवस्था करणे हे जिकरीचे ठरेल. टाळेबंदीमुळे शाळांना शुल्क कपात देखील करावी लागली आहे, त्यामुळे आवश्यक तेवढे शिक्षक, सेवक आणि अन्य कर्मचारी पुन्हा भरती करताना त्यांच्या वेतनाचा भार देखील शाळा प्रशासनावर पडणार आहे हे निश्चित आहे. आधीच कमी झालेल्या उत्पन्नावर चालणाऱ्या शाळांपुढे नवीन भरती म्हणजे; दुष्काळात तेरावा महिना असेच ठरू शकते. सध्या कोविडचा नवीन प्रकार (व्हेरियंट) उद्भवल्याने राज्य सरकारने नवी नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. नियमभंग करणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक, दुकानदार, संस्था यांचेकडून रु. ५००० /- ते ५००००/- पर्यंत दंड वस