लॉकडाऊन ऍट सोलापुर .....
एक सोलापुरी संवाद
(संपूर्णपणे काल्पनिक)
चन्या : (फोनवरूनच ) का कराला ??
मन्या : का कराव... बसलो घरी गुमान ... काम ना धंधा बोल गोविंदा अशी कंडिशन झाली बग ....
चन्या : हां बे माज बी तसंच झालय बे ... भाईर जावं तर पोलीस हंतेत बे धरून ... आमच्या बाजूचा बंड्या हाय ना ?
मन्या : ते काळ्या तोंडाचं ढापणं ?
चन्या : हां तेनीच बे ... तेला सांगायलेत सगळे, नको जाऊ बे... नको जाऊ बे.. भायेर .. पन खाज बे बुडाला ....
गेला बग चौकात ... अरे बाप रे असा हाणले बे पोलीस .... कुत्र्यागत हाणले बे ... आता झाली का मज्जा ....
भायेर फिरायला बी येईना आनी एवढा सुजवलेत .... की घरी बूड टेकून बसता बी यीना...
मन्या : म्हनून म्हनतो पोलिसांचं ऐकावं बे... ... तेनी तरी किती सांगावं बे समजून ...
लोकं बी येड्या डोक्याचेत ... मग काय करावं तेनी .... देतेत फटके रप्प किनी ...
चन्या : पोलिसांचं सोड बे सवता साठी तर घरी बसाव बे गप .... ते कोरोना वायरस लै डेंजरय बे .... बिना मास्कच दिसालाव ना की घुसलाच बाबा अंगात ... चौदा दिवसात चौदावा घालावा लागतंय म्हणे ....
मन्या : ए गप बे.... फैलाच हिथं टेन्शन हाय समज .... अजून चौदावा बिवदावा म्हणून उगाच पुनग्या टाईट करायला का बे ... कोरोना बरा बी होतंय बे येड्या डोक्याच्या ....
चन्या : ते बी हाय म्हना ... पण लै हुशारी करू नको येवडंच सांगायला फोन केलो बे .... संभाळ बे जीवाला ....
लै उधारी द्यायचा तू माजी ... उगाच गेला बीला तर फुकट माझे पैशे बुडायचे बे... (जोरात हसतो.. )
मन्या : का बे कडू .... एवढ्या लवकर जात नसतो बे मी... कोरोना संपल्यावर पाव चटणी खायची बे भैयाची .... तवा आता तू बी काळजी घे..
चन्या : हां बे ... चल ठिवतो आता... घरचे ओरडायलेत उगाच ....
मन्या : हां बाय ...
---- श्रीपाद श्रीकांत रामदासी
मु. पो. धायरी... मार्गे सोलापूर ...
Comments