Posts

Showing posts from July, 2024

हिंदूंपुढील आव्हाने : भाग १

Image
  श्रद्धा-अंधश्रद्धेचा गोंधळ सद्यस्थिती मध्ये, जरा डोळे उघडे ठेवून पहिले तर, या देशातील बहुसंख्यांक असणाऱ्या हिंदू समाजापुढील काही प्रश्नांचे आकलन होते.  अर्थात बहुतेक हिंदूंना या बाबी;  " प्रश्न " किंवा " आव्हाने " या सदरात मोडतात याची जाणीव देखील नाही. हिंदू समाजात; एक हिंदू म्हणून वावरताना जाणवलेल्या बाबी आणि आमच्या अल्प, स्वल्प मतीनुसार त्यावरील तोडगे हे आम्ही या लेखामालेद्वारे मांडत आहोत. अर्थात हेच एक अंतिम सत्य आहे असा आमचा दावा नाही. आम्हांस जाणवलेल्या, उमगलेल्या आव्हानांची शिदोरी आम्ही वाचंकांपुढे उघडत आहोत तथापि त्यात असणाऱ्या चुका, उणिवा दाखवून दिल्यास आम्ही त्या विनम्रपणे स्वीकारून त्यावर नक्कीच विचार करू.  " धर्म म्हणजे अंधश्रद्धांचा बाजार " अश्या मताचे समाजमन निर्माण करण्यात काही मंडळी यशस्वी झाली आहेत. अर्थात याला फशी पडणारी मंडळी केवळ हिंदूच आहेत. हिंदूंचा वैचारिक अति पुढारलेपणा, धर्मचिकित्सेची असणारी समाज मान्यता यांमुळे, कथित सुशिक्षित समाज हा साऱ्याच धार्मिक श्रद्धांना " अंधश्रद्धा " मानण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचला आहे.  अह...