सावरकर एक दीपस्तंभ : भाग ५ वा.
अमरवंश सावरकर गांधी हत्या अभियोगातून निर्दोष आणि निष्कलंक मुक्तता झाल्यावर सावरकर प्रकृती स्वाथ्यासाठी बंगलोरला काहीदिवस राहून आले. तदनंतर त्यांनी पुन्हा कार्यास आरंभ केला पण पुढच्या काही महिन्यातच , १९ ऑक्टो १९४९ रोजी , नारायण सावरकरांचा मृत्यू झाला. हा प्रसंग सावरकरांच्या मनाला चटका लावणारा होता ; " तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू " असा बंधुत्वाचा संदेश समाजाला देणाऱ्या सावरकरांच्या बंधूला , मात्र समाजकंटकांनी ठेचून ठेचून मारले. सावरकरांचे दोन्हीही बंधू कालवश झाले होते सावरकरांचे मन त्यावेळेस विच्छिन्न झाले होते परंतु समाजाचे दुःख संपवण्यासाठी जगणाऱ्या महापुरुषांना स्वतः ची वैयक्तिक सुखेच नव्हे तर दुःखेदेखील बाजूला सारूनच मार्ग क्रमावा लागतो. सावरकरांच्या अंदमान सुटकेसाठी जर कोणी जीवाचा आटापिटा केला असेल तर तो नारायणरावांनी...