वासुदेव हा वासुदेवच.....
गेले दोन - तीन दिवस झाले, सांता क्लोज नको वासुदेव हवा , लाल टोपी नको वासुदेवाची टोपी घाला, महाराष्ट्राचा हरवलेला सांता क्लोज म्हणजेच वासुदेव ..... अश्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वाचल्या. खरं तर सांता क्लोज आणि वासुदेव यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. सांताच्या डोक्यावर टोपी आणि वासुदेवाच्या डोक्यावर पण टोपी म्हणून त्यांचा बादरायण संबंध जोडणे हे योग्य नाही. सांता आणि भारतीय यांचा तसा सांस्कृतिक दृष्ट्या काहीही संबंध नाही, मुळात सांता क्लोज ही काही कुठली धार्मिक संकल्पना नाही. त्यात, कोणत्याही प्रकारचे ईश्वरीय अनुष्ठान नाही की; भक्तिमार्गाचे विवरण नाही. युरोपियन चर्च मधून १८व्या शतकात केवळ ख्रिश्च्यानिटीचा प्रसार करण्यासाठी म्हणून, ख्रिसमसच्या निमित्ताने जगभर प्रसिद्धीस आणलेले पात्र म्हणजे हा सांता क्लॉस. हां ! सांताचे; आपली खरी ओळख लपवून, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे; ही बाब उल्लखनीय असली तरी त्यात ईश्वरीय अनुष्ठान कुठेच नाही. त्याच्या अगदी उलट; ईश्वरीय अधिष्ठान असणारा जनमानसातील एक म्हणजेच वासुदेव. प्रापंचिकाला देवाच...