हिंदू ऐक्याची विजयादशमी साजरी करूया !
इतिहासामध्ये सत्याचा असत्यावर , सद्प्रवृत्तीचा खलप्रवृत्तीवर झालेलया विजयाचे प्रतिक म्हणजे विजयादशमी . हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांमधून विजयादशमीची असलेली वर्णने ही , नीतीचा अनीतीवर होणाऱ्या विजयाचे प्रतिक अश्या संदर्भात आलेली आहेत . विजयादशमी या सणाला , दसरा असेही म्हणतात हे सर्वश्रुतच आहे , याच दिवशी सीमोल्लंघन करायची परंपरा आपल्याकडे आहे . तसेच विजयादशमीच्या आदल्यादिवशी म्हणजे नवमीला असणारी शस्त्रपूजनाची परंपरा देखील आहे . आजच्या काळात या सणांचे महत्व हे केवळ धार्मिक ग्रंथांमधून सांगितलेल्या कथा , घटना यांचे स्मरण करण्या पुरते मर्यादित नाही ; तर हे सण एक प्रेरणा आहेत असे मला वाटते . सद्यस्थितीत हिंदू समाजाने , या सण उत्सवांमधून घेण्याची प्रेरणा , या बद्दल या लेखामध्ये आम्ही काही विचार मांडत आहोत . एकंदरीतच घडणाऱ्या घटना, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता, हिंदू समाजामध्ये , जात , पंथ , प्रांत , भाषा अश्या अनेक बाबींवरून परस्पर द्वेष भावना उत्पन्न करण्याचे कुटील कारस्थान ; काही समाजघट...