Posts

Showing posts from August, 2022

आपली मातृभूमी

Image
  ऑगस्ट महिना हा प्रत्येक भारतीयांसाठी विशेष असतो कारण याच महिन्यात आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो .  यंदाचा स्वातंत्र्यदिन हा आपल्या सर्वांसाठी अधिकच विशेष आहे , कारण स्वातंत्र्याची पंचाहत्तरी या वर्षी पूर्ण झाली आहे . १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत इंग्रज राजवटीपासून मुक्त झाला असला तरी या देशाचे , राष्ट्राचे अस्तित्व फार फार पुरातन आहे . आपण प्रत्येकजणच या देशाला केवळ आखीव सिमा असणारा एक भूपृष्ठ भाग न मानता , आपली माता मानतो . आपल्या देशाच्या नावातच ( भारत ) हे राष्ट्र आपली माता असल्याचे स्पष्ट होते . आपल्याकडे एखाद्या स्त्रीला आदराने हाक मारताना , तिच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावानेच संबोधले जाते . उदा . श्याम ची आई , रमाची आई वगैरे वगैरे . स्त्रीची ओळख करून देताना , सौभाग्यवती अमुक तमुक हे संबोधन पाश्चिमात्य संस्कृतीत वापरले जाते परंतु आपल्याकडे मात्र तिच्या अपत्यांच्या नावानेच हाक मारली जाते . फार फार पूर्वी आपल्याकडे भरत नावाचा एक पुण्यशील राजा होऊन गेला ह