Posts

Showing posts from April, 2020

महालेखक : डॉ.धनंजय कीर

Image
डॉ.धनंजय कीर चांगले चरित्र जगणे हे जसे कठीण असते तसेच थोर पुरुषांची चरित्रे उत्तमरीतीने लिहिणे हे देखील मोठे जिकिरीचे आणि जबाबदारीचे कार्य असते. या दोनही गोष्टी ज्या काही थोड्याफार भारतीय चरित्रकारांनी जपल्या आहेत त्यातील एक अग्रणी म्हणजे डॉ.धनंजय कीर . रत्नागिरीच्या खडपे वाठारांत २३ एप्रिल १९१३ रोजी , धनंजय कीर यांचा जन्म वडील विठ्ठल आणि आई देवकी यांच्या पोटी झाला. धनंजय कीर हे रत्नागिरीच्या दक्षिणेस तीन -साडेतीन किलोमीटरवर असणाऱ्या जुवे बेटावरील श्रीमंत अश्या गोविंद कीर यांच्या भंडारी कुळात त्यांचा जन्मलेले. गोविंद कीर हे त्यांचे पणजोबा होत. धनंजय कीर जरी श्रीमंत कुटुंबात जन्मले असले तरी स्थलकाल परत्वे त्यांच्यापिढीपर्यंत ही श्रीमंती टिकली नाही. त्यांचे वडील सुतारकाम व ड्रॉईंग ची कामे करत असत. त्यांना सगळे कीर मिस्त्री असे म्हणत असत. वयाच्या सहाव्या वर्षी धनंजय कीर हे देखील चित्रशाळेमध्ये , ड्रॉईंग आणि सुतारकाम करण्यासाठी जात असत. कीरांच्या लहानपणी घरची परिस्थिती बेताचीच असे परंतु तशाही परिस्थिती ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.  खरे तर कीरांचा आणि शालेय