Posts

Showing posts from October, 2021

श्री जगदंबा सप्तक

Image
आदिशक्ती तुळजाभवानी छायाचित्र स्रोत नमो आदिशक्ती तुळजाभवानी, नमन तुजला हे वरदायिनी नमो महालक्ष्मी सूक्ष्मरूपिणी, नमन तुजला हे वैभव दायिनी नमो कालीदुर्गा तू दैत्यहरणी, नमन तुजला हे करवीर निवासिनी  नमो सरस्वती तू हंसवाहिनी, नमन तुजला हे विद्या दायिनी नारायणाची तू नारायणी, कधी शिवाची तू शिवगामीनी  कधी शांता, कधी दुर्गा, कधी असे तू मोहिनी  तूच रेणुका, तूच कालिका, तूच मोक्षदायिनी  भक्तांना देसी आसरा, तूच जग उद्धरणी अनंत रूपे जगात असती, तशीच असती मम जीवनी  रूप तुझे हे कधी पत्नी, परी कधी भासे जननी जगदंब .. जगदंब... जगदंब....