Posts

Showing posts from August, 2021

जागर हिंदुत्वाचा

Image
  विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांसाठी रचलेले एक मेळावा गीत.     जागर हिंदुत्वाचा ; करू जागर हिंदुत्वाचा || धृ. ||   औरंग्या गाडू हिंदुद्वेषाचा ; अफझुल्ल्या फाडू राष्ट्रद्रोहाचा अवघा हिंदू एकची आहे ; मंत्र जपू हा बंधुत्वाचा || १ | |   त्याग स्मरुनी शिव-शंभूचा ; ध्यास घेऊ हिंदुराज्याचा मंदिर भव्य करणे आहे ; ध्यास करू हा हिंदू हिंदूचा || २ ||   संकल्प करुनी गोसेवेचा ; आशिष घेऊ संतजनांचा उपदेश घेऊनि भग्वदगीतेचा ; वारसा जपू हा चक्रधराचा || ३ ||   बजरंगी होऊनी बजरंग दलाचा ; अवतार होऊया बजरंगाचा अवरोध होता दुष्ट दुर्जनांचा ; अवलंब करू लंकादहनाचा || ४ ||   दिक्षित होऊन हिंदू रक्षेचा ; प्रशिक्षित होऊन शस्त्रास्त्रांचा मार्ग क्रमूनी गोविंदसिंगांचा ; झेंडा रोवू हिंदुविजयाचा || ५ ||   जन्म आपुला शौर्यासाठी ; देव देश अन धर्मासाठी अभिषेक करुनि शत्रू रुधिराचा ; सन्मान करू भारत मातेचा || ६ ||   जागर हिंदुत्वाचा करू जागर हिंदुत्वाचा

तो नक्की आहे का ?

Image
  टिप : सदर कथा ही संपूर्णपणे काल्पनिक असून, याचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नाही.  पहाटेचा बोचरा वारा अंगाला नुसता झोंबत होता. नुकताच पूर ओसरल्यामुळे गावगाडा हळूहळू जागेवर येत होता.  पहाटे ४:३० च्या सुमारास, डॉक्टर साहेबांना हाका मारत नीलकंठ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धावत आला.  केंद्रातील डॉक्टर राकेश यांना नुकताच डोळा लागत होता, नीलकंठचा आवाज ऐकून डॉक्टर बाहेर आले.  नीलकंठ धापा टाकतच म्हणाला " सरपंचांना छातीत दुखतंय, लै त्रास होतोय जरा येताव का ? " डॉ. राकेशने तात्काळ आपली बॅग उचलली आणि सरपंचांच्या घरी पोहोचले, तपासणी करताना लक्षात आले की हा सौम्य हृदयविकाराचा झटका आहे.  अश्या रुग्णांना आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध नव्हती, आणि तालुक्याहुन ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्याची शक्यता पण कमी होती .... त्यांनी सांगितले की; " मोठ्या गाडीची सोया करा ... तालुक्याला न्यावे लागेल. " खरं तर हे सांगितल्यावर स्वतः डॉक्टरांनाच कसे तरी वाटले; कारण पुरात गावातल्या बहुतेक गाड्या खराब झाल्या होत्या... नाही म्हणायला रंगराव देशमुखांची  गाडी तेव्हढी वाचली होती.... पण रंगराव आण