मराठ्यांचा अग्निपथ : पानिपत..... !
युद्धभूमीवरील स्मारक (काला आम) युद्धस्य कथा रम्य : । असे म्हटले जाते . युद्धाच्या कथा ऐकण्यासाठी जितक्या रम्य , श्रवणीय असतात तितक्या त्या प्रत्यक्षात असतात का ? नाही मुळीच नाही ! धूळ , आक्रन्दने यांनी कोंदट झालेले वातावरण , जखमी सैनिकांचे आणि प्राण्यांचे विव्हळणे आणि मैदानभर मूडद्यांचा खच ..... ही वर्णने निश्चितच रमणीय असू शकत नाहीत . आज पासून तब्बल २६१ वर्षांपूर्वी असेच एक भयंकर , भीषण युद्ध उत्तर भारतामध्ये कुरुक्षेत्राजवळ झाले होते . " लाख बांगडी फुटली , दोन मोत्ये गळाली , २७ मोहरा गमावल्या " ( अर्थात एक लाख माणसे मारली गेली , दोन खास नेते गेले आणि २७ प्रमुख सरदार गमावले ) असे सांकेतिक वर्णन ज्या महायुद्धाबद्दल केले जाते महायुद्ध म्हणजेच पानिपत चे ३ रे युद्ध " मराठ्यांचा अग्निपथ ; पानिपत ....! " पानिपत हा शब्द उच्चारल्याबरोबर ज्यांच्या मनात " हरलेले युद्ध " असा विचार येतो ; त्यांना पानिपत कधीच समजणार नाही . कोणत्याही युद्धाचा पर