विनम्र आवाहन !!!
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सप्रेम नमस्कार !!!
श्री आत्माराम महाराज कृत श्रीरामदासपंथक्रमसार या 102 वर्षापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथाचे प्रकाशन सत्कार्योत्तेजक सभा धुळे तर्फे 24 जून 2018 रोजी धुळे येथे झाले.
धुळे येथील श्री सत्कार्योत्तेजक सभा आणि श्री समर्थ वाग्देवता मंदिर या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या या समर्थ सेवेचे खरोखर च कौतुक करावेसे वाटते.
श्री रामदासपंथक्रमसार हा श्री आत्माराम महाराज एक्केहाळीकर यांचा ग्रंथ म्हणजे प्रत्येक रामदासी सांप्रदायिकासाठी एक आदर्श आचार्य संहिता सांगणारा ग्रंथ आहे.
फक्त 16 अध्याय आणि 548 ओव्या असणा-या या ग्रंथाची " सारांचेही सार " ही अप्रतिम प्रस्तावना समर्थ ह्रदय श्री नानासाहेब देव धुळे यांनी लिहिलेली आहे .
या ग्रंथाची किंमत फक्त रू 50/- आहे.
आपण इतर सांप्रदायिक व्यक्ती आणि इतरांना हा अमूल्य ग्रंथ भेट म्हणून पण देऊन समर्थ विचारांचा प्रचार करू शकता.श्री सत्कार्योत्तेजक सभा/ श्री समर्थ वाग्देवता मंदिर यांचा संपर्क क्रमांक खाली स्वतंत्रपणे देत आहे.
टिप:
हे आवाहन केवळ संपर्क-प्रचार सेवा या साठी असून,
ग्रंथ उपलब्धतेसाठी श्री. समर्थ वाग्देवता मंदिर यांचेशी थेट संपर्क करावा.
संपर्क सूत्र : श्री.डोंगरे ९८९०२८६७११
Comments