डॉ.ए पी जे अब्दुल कलाम
।। जय रघुवीर ।।
आज १५ ऑक्टोबर.....
भारताचे माजी राष्ट्रपती महामहिम मिसाईलमॅन, डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन.
स्वतः एक वैज्ञानिक असूनही आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आणि मान्यता यांचा सदैव आदर करणारे एक महान देशभक्त अशी त्यांची ओळख सांगता येईल.
डॉ. कलामानी जेंव्हा पहिले भारतीय बनावटीचे हावरक्राफ्ट बनवले तेंव्हा, त्याला 'नंदी' असे नाव दिले होते. त्याचप्रमाणे सर्वच क्षेपणास्त्राला देखील भारतीय संस्कृतीला साजेशीच नावे दिली आहेत, उदा. पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग आणि ब्रम्होस ई.
डॉ. कलाम यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याकरता त्यांचे " विंग्स ऑफ फायर" हे आत्मचरित्र वाचावे,
याचा मराठी अनुवाद " अग्निपंख " या नावाने प्रकाशित झालेला असून मूळ चरित्राचा अनुवाद,
प्रा. माधुरी शानभाग यांनी केलेला आहे.
हे चरित्र सतत काहीतरी सकारात्मक कार्य करण्यासाठी धडपडणार्यासाठी मार्गदर्शक ठरेल असेच आहे.
त्यांच्या चरित्रातील एक वाक्य नेहमी मला स्फूर्ती देणारे आहे, त्या वाक्याचा आशय असा,
" आपण, यश अगदी चार पावले दूर असताना निराशेने खचून जातो; परंतु असे खचून न जाता
अथक परिश्रम केल्याने यश निश्चितच प्राप्त होते. "
एका सर्वसामान्य, सत्शील तामिळ कुटुंबामध्ये जन्म घेऊन स्वतःच नव्हे तर आपल्या राष्ट्राला असामान्य पातळीला घेऊन जाणाऱ्या जगन्मान्य, श्रद्धेय डॉ. कलाम यांना विनम्र आभिवादन.
श्रीपाद श्रीकांत रामदासी
धायरी पुणे-४१

Comments