टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते

 


Image_Source


कवी मनाचा राजकारणपटू म्हणजेच भारताचे दिवंगत पंतप्रधान, " भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी ". 

त्यांची संघ स्वयंसेवक, संवेदनशील नेता, अजोड वक्ता, उत्तम संसदपटू अशी अनेक रूपे ही सर्वांनाच ज्ञात आहेत. 

परंतु आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त ( २५ डिसेंबर ) आम्ही त्यांच्यातील उत्स्फूर्त कवी या पैलूचा आधार घेत; त्यांच्या फारश्या प्रचलित नसलेल्या पण, आम्हांस प्रेरणादायी  वाटलेल्या त्यांच्या दोन कविता आम्ही, वाचकां समोर मांडत आहोत.  

१) टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते:

सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, बऱ्याच प्रसंगातून जावे लागते, कधी मन उदास करणारे प्रसंग येतात तर कधी उद्वेग वाटावा असे प्रसंग येतात. जो सत्य आणि तत्वाच्या मार्गावर चालत असतो त्याला तर प्रसंगी सत्तेशी संघर्ष करावा लागतो. 

असत्य आणि दमनशक्तीचा अंधकार तुमच्यातील उर्मीचा अंतिम  किरण सुद्धा झाकळण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा आपली तत्वे, ध्येय, धोरण यांच्या सन्मानासाठी, रक्षणासाठी, संकटांच्या छाताडावर पाय रोवून, तुम्हाला गिळंकृत करू पाहणाऱ्या अंधकाररुपी  अजगराच्या पोटात शिरून, सर्व शक्तीनिशी त्याला फाडून पुन्हा सिद्ध व्हावे लागते. 

तत्वांसाठी, सत्यासाठी निरंतर संघर्ष करत असताना, शड्डू ठोकून, ताठ मानेने सांगावे लागते की;

" हम झुक नहीं सकते "


सत्य का संघर्ष सत्ता से, न्याय लड़ता निरंकुशता से ।

अंधेरे ने दी चुनौती है, किरण अंतिम अस्त होती है ।।


दीप निष्ठा का लिये निष्कंप, वज्र टूटे या उठे भूकंप ।

यह बराबर का नहीं है युद्ध, हम निहत्थे, शत्रु है सन्नद्ध ।।


हर तरह के शस्त्र से है सज्ज, और पशुबल हो उठा निर्लज्ज ।

किन्तु फिर भी जूझने का प्रण, अंगद ने बढ़ाया चरण ।।


प्राण-पण से करेंगे प्रतिकार, समर्पण की माँग अस्वीकार ।

दाँव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते ।।


टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते !२)  कौन कौरव कौन पांडव :

समाजाचे, राजकारणाचे बदलते स्वरूप पाहून अटलजीना प्रश्न पडतो की;  सद्यस्थितीतील सत्ता संघर्षात नेमके पांडव कोण ? आणि कौरव कोण ? 

अटलजींचे निरीक्षण, मनातील शल्य शब्दांतून व्यक्त होते आणि त्यातूनच एक काव्य निर्माण होते. 

" कौरव कौन, कौन पांडव  "


कौरव कौन, कौन पांडव, टेढ़ा सवाल है।

दोनों ओर शकुनि का फैला कूटजाल है।


धर्मराज ने छोड़ी नहीं, जुए की लत है।

हर पंचायत में पांचाली अपमानित है।


बिना कृष्ण के, आज महाभारत होना है,

कोई राजा बने, रंक को तो रोना है।


त्यांच्या या  दोन्ही कविता, या कालातीत आहेत  वाटते.  काव्य निर्मिती असो वा सभेतील भाषण आपल्या प्रतिभेची उंची आणि खोली  यांचे प्रत्यंतर देणाऱ्या,  भारतपुत्रास शतशः नमन !

Comments