तो लेख छापून चुकलो : " द वीक " ची दिलगिरी.
पत्रकार निरंजन टकले यांचा, स्वा. सावरकर यांची बदनामी करणारा लेख, द वीक ने पाच वर्षांपूर्वी छापला होता, पण तो लेख छापण्यात झालेली चूक आता त्यांना जाणवत असल्याने " द वीक " ने दिलगिरी व्यक्त केली आहे.
स्वा. सावरकरांचा द्वेष करणाऱ्या नतद्रष्ट मंडळीना पुन्हा एकदा चपराक बसली आहे. त्याचाच आढावा या लेखातून घेत आहोत.
तो लेख छापून चुकलो : " द वीक " ची दिलगिरी
गेल्या काही वर्षांपासून स्वा. सावरकरांची बदनामी करण्याचे सत्र सुरु आहे.
२०१४ साली सावरकरांना आदरणीय मानणाऱ्या भा ज पा चे सरकार सत्तेत आल्यापासून, स्वा. सावरकरांच्या बदनामीला जास्तच उधाण आल्याचे दिसून आले आहे.
काही पत्रकार, राजकीय नेते हे स्वा. सावरकरांची बदनामी सातत्याने करत आले आहेत. त्याच प्रमाणे अश्या वक्तव्यातून, लेखनातून स्वा.सावरकरांविषयी जनमानसामध्ये कटुता निर्माण करणे आणि द्याद्वारे एकंदरीतच हिंदुत्ववाद्यांना बदनाम करणे हाच हेतू यामध्ये दिसून येत आहे.
या षडयंत्रातीलच एक भाग वाटावा असा लेख पत्रकार निरंजन टकले यांनी " द वीक " या पत्रात लिहिला होता. त्यातील मजकूर, आरोप यांची शहानिशा न करताच " द वीक " यांनी तो लेख प्रकाशित देखील केला होता.
तो लेख आणि त्यातील मजकूर याच्या विरोधात, स्वा. सावरकरांचे वंशज श्री. रणजित सावरकर यांनी न्यायालयामध्ये फिर्याद केली होती.
पाच वर्षाच्या निरंतर संघर्षानंतर अखेर काल १४ मी रोजी, " द वीक " ने दिलगिरी व्यक्त करत, तो लेख छापण्यात चूक झाली असे मान्य केले आहे. खरे ही अशी दिलगिरी म्हणजे आधी वार करून मग त्यावर मलम लावण्यासारखे आहे.
ज्यावेळेस एखाद्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वा बद्दल काही प्रकाशित होणार असेल तर त्याची शहानिशा करणे ही त्या मासिकाची किंवा वृत्तपत्राची जाबदारीच असते. परंतु २०१६ साली असे झालेले दिसत नाही किंवा मुद्दाम या बाबी कडे दुर्लक्ष केले होते असेच वाटते. त्या लेखाचे लेखक पत्रकार निरंजन टकले आणि तत्कालीन संपादक हे दोघेही आत्ता " द वीक " साठी काम करत नाहीत.
द वीक ने व्यक्त केलेली दिलगिरी, त्या लेखाचा खोटारडेपणा सिद्ध करत आहे त्यामुळे, निरंजन टकले यांच्या लेखनावर किती विश्वास ठेवायचा ? याचा विचार वाचकांनी करायचा आहे.
२८ मे रोजी स्वा. सावरकरांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
टिप : या बातमीतील सत्यता पडताळून पाहिलेली असून, त्याची लिंक आमच्याकडे सुरक्षित आहे.
Comments