सिंहगड रस्ता परिसरात संपन्न होणार.. "रक्तदान महायज्ञ"




सिंहगड रस्ता परिसरात संपन्न होणार रक्तदान महायज्ञ

रक्तदान शिबिराच्या प्रथम वर्षीचे संकलन २७६ एकक, दुसऱ्या वर्षीचे संकलन ५१६ एकक, तिसऱ्या वर्षीचे संकलन ११७७ एकक. हे आकडे कोणाही बड्या नेत्याने किंवा व्यावसायिकाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे नसून, विश्व हिंदू परिषद-बजरंग दल सिंहगड भागाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे. 

होय! विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग गेल्या तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते, भारतीय सैन्यातील हुतात्मा जवान आणि हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपल्या शहराची रक्ताची गरज भागविण्यात हातभार लागावा, तसेच शक्य तितक्या गरजू रुग्णांचे प्राण वाचावेत यां करीताच हा रक्तदान रुपी सेवायज्ञ चेतवला जातो, म्हणूनच या उपक्रमाला 
"रक्तदान महायज्ञ" असे नाव देण्यात आले आहे. मागील वर्षी एकाच दिवशी एकाच वेळी १५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ११७७ एकक रक्तसंकलन करण्यात यश मिळवले आहे. 

या उपक्रमाची दखल घेत, पुणे शहरातील रक्तदान क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या संस्था असा सन्मान, नाते रक्ताचे ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य अतुलशास्त्री भगरे यांनी देखील या उपक्रमाचे, जाहीर कौतुक केले आहे.
या महायज्ञाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, हा उपक्रम राबवण्याकरता कोणत्याही राजकीय नेते, सामाजिक संस्था यांचे कडून रोख स्वरूपात, निधी घेतला जात नाही. या महायज्ञाचा सर्व खर्च संघटनेचे स्थानिक पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने स्वतःच करत असतात. त्याचप्रमाणे रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारच्या गिफ्टचे आमिष दाखवले जात नाही, आणि म्हणूनच या उपक्रमामधे १०० हुन अधिक गणेश मंडळे, सेवा भावी संस्था, प्रतिष्ठाने, फाउंडेशन्स देखील सक्रिय पणे सहभागी होतात. तथापि ज्यांना कोणाला सहकार्य करायचे असेल ते व्यवस्था स्वरूपात किंवा प्रचार प्रसिद्धी साठी आवश्यक फ्लेक्स, बॅनर लावून करू शकतात. या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी, रक्तदान विषय उपदेशपर स्फुट लेख, काव्ये,  व्हिडीओद्वारे, सोशल मीडियातुनदेखील केली जाते.

मागील वर्षी १५ रक्तदान केंद्रांमधून, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, आमदार, खासदार, डॉक्टर, वकील, आय टी प्रोफेशनल्स यांसारखे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह १०००० हुन अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.

संघटनेच्या वतीने या वर्षीही भव्य अश्या रक्तदान महायज्ञाचे आयोजन ४ टप्प्यात होत असून पहिले दोन टप्पे या महिन्यांत(डिसेंबर २०१८) पूर्ण झाले आहेत. या दोन टप्प्यामधून ६०० एककहुन अधिक रक्तसंकलन झाले असून पुढील दोन टप्पे रविवार दि. ६ जानेवारी २०१९ आणि रविवार दि. १३ जानेवारी २०१९ पार पडणार आहेत.यंदाच्या वर्षी २० रक्तदान केंद्राची उभारणी करण्यात आली असून मागील वर्षीचा आपलाच विक्रम मोडण्याचा निश्चय विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी केलेला आहे.

एका रक्ताच्या बाटलीतून किंवा पिशवीतून तीन रुग्णांचे प्राण वाचवता येतात, त्यामुळे आजपर्यंत या उपक्रमाद्वारे, सुमारे ६००० रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. हा समाजउपयोगी उपक्रम राबवणारे आयोजक हे समाजशील तरुणाई आहेत, आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकी जपू पाहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आयोजकांना उत्तेजन देणे गरजेचे आहे असे आम्हांस वाटते म्हणूनच हा लेखन प्रपंच.

या महायज्ञाच्या आयोजकांशी खालील क्रमांकावर संपर्क करावा,

केतन घोडके --- ९९२११११११६, शरद जगताप --- ९८२२०६२२४४, प्रीतम बहिरट --- ९४२२००३४२४,

साईनाथ कदम --- ७२७६७९८९८९संपत चरवड --- ८७९३१०१०१०, योगेश देशपांडे --- ९७६४४४७२२३,

राजू कुडले --- ९८८१८३३६३३, महेश चिलमे ---  ९८५०९०१६३९, प्रसाद मते ---  ९९७००००८८७, 

समीर रूपदे --- ९८५०५६७४७५, सागर बेलसरे --- ९९६०५२२७२६, रवी राठोड --- ९०६७९४८४३२, 

सचिन गुळाणीकर --- ९८२२६६६९३८, अविनाश शिखरे --- ७२१८८३९८०९,  

सचिन लोखरे --- ९९२१०२२३४५, श्रीपाद रामदासी --- ८०८७६२२११८

Comments