समग्र रामदास ऍप
" समग्र रामदास ऍप "
समर्थ श्रीरामदासस्वामींच्या समग्र वाङ्मयाचा समावेश असणारे App
......जय जय रघुवीर समर्थ !!
समर्थभक्त सज्जनहो,
राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदासस्वामी महाराज !
सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रदेशात नवचेतना निर्माण करणारे एक अलौकिक, अद्भुत आणि अद्वितीय संत !
बालवयातच विश्वाच्या चिंतेने व्याकूळ झालेल्या आणि अवघ्या बाराव्या वर्षीच ऐहिक सुखाचा त्याग करून श्रीरामरायाच्या अोढीने बाहेर पडलेल्या श्रीसमर्थांनी पुढे बारा वर्षे तपश्चर्या - पुरश्चरण करून श्रीरामाला प्रसन्न केले. तीर्थाटनातून हिंदुस्थानातील परकीय सावटाची जाणीव होताच संघटन करून कित्येक समाजविधायक कार्ये समर्थांनी केली. धार्मिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक इत्यादी सर्वच विषयांवर समर्थांनी चोख व आजच्या भाषेत सांगायचे तर अतिशय विज्ञानवादी मार्गदर्शन त्याकाळातच करून ठेवलेले आहे.
काय त्यांची क्रांतदर्शी प्रतिभा ! आपल्या विपुल अशा वाङ्मयामधून आध्यात्मिकासोबतच व्यावहारिक विषयांवर समर्थांनी मांडलेले विचार आजही जसेच्या तसे उपयोगी पडणारे आहेत. कारण तेच शाश्वत आहेत !
आजच्या प्रगत काळाची गरज ओळखून, समर्थांचा हा प्रगल्भ वाङ्मयसंभार सोबतच्या लिंकवरील ऍपच्या माध्यमातून जगभरातील वाचक-अभ्यासकांसाठी आम्ही प्रेमपूर्वक सादर करत आहोत. या 'समर्थ' वाङ्मयाच्या वाचन-मननाने व चिंतनाने आपल्याही आयुष्याला सुख-समाधानाची सुयोग्य दिशा मिळो व सर्वांच्या जीवनाचा महोत्सवच साजरा होवो हीच मन:पूर्वक शुभेच्छा !
हे विनामूल्य उपलब्ध झालेले अनमोल शब्दधन आपल्या सर्व परिचितांनाही आवर्जून पाठवावे या प्रेमळ आग्रहासह, तुम्हां सर्वांना पुनश्च एकवार 'जयजय रघुवीर समर्थ' !
https://play.google.com/store/apps/details?id=com.shrisamarthavatar
टिप:
ही माहिती केवळ प्रचार सेवा करणे साठी प्रसारीत केली असून या ऍप चे सर्व श्रेय,
ऍप निर्मात्यांना आहे.
Comments
Discover the rise and fall of the king casino, one of the world's largest The Casino is https://septcasino.com/review/merit-casino/ operated by the titanium flat iron King Casino 출장안마 Group. casinosites.one You ventureberg.com/ can