इंडिया! इंडिया !! इंडिया !!!
------------------------------------------------------------------ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी जवळ आले कि एक पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत असते कि भारताला इंग्रजी मध्ये INDIA असे का म्हणतात ? त्याचे कारण असे सांगितले जाते की ; I - Independent N- Nation D- Declared I - In A- August आणि वरून असेही सांगितले जाते कि INDIA हे नाव स्वा. सावरकरांनी सुचवलेले आहे. आमची सुज्ञ भारतीयांना नम्र विनंती आहे कि असल्या भंपक आणि तद्दम खोटारड्या पोस्टवर आजिबात विश्वास ठेवू नका. मुळात ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळालेला भारत हा एकमेव देश नाही. भारताप्रमाणे , पाकिस्तान , कोरिया , काँगो असेही देश ऑगस्ट मध्येच स्वतंत्र झाले होते. तसेच इंडिया हा शब्द किमान २०० वर्षे जुना आहे , १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देखील हा शब्द अस्तित्वात होता. १८५७ च्या उठावावेळीची एक प्रसिद्ध घोषणा होती " खुल्क खुदा का , मुल्क बादशाह का , अमल कुंपणी सरकारका " या मधले कुंपणी सरकार म्हणजे " ईस्ट इंडिया कंपनी " चे सरकार होय. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेला (१९४२) इंग्