हिंदू ऐक्याची विजयादशमी साजरी करूया !


इतिहासामध्ये सत्याचा असत्यावर, सद्प्रवृत्तीचा खलप्रवृत्तीवर झालेलया विजयाचे प्रतिक म्हणजे विजयादशमी.

हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांमधून विजयादशमीची असलेली वर्णने ही, नीतीचा अनीतीवर होणाऱ्या विजयाचे प्रतिक अश्या संदर्भात आलेली आहेत.

विजयादशमी या सणाला, दसरा असेही म्हणतात हे सर्वश्रुतच आहे, याच दिवशी सीमोल्लंघन करायची परंपरा आपल्याकडे आहे. तसेच विजयादशमीच्या आदल्यादिवशी म्हणजे नवमीला असणारी शस्त्रपूजनाची परंपरा देखील आहे.

आजच्या काळात या सणांचे महत्व हे केवळ धार्मिक ग्रंथांमधून सांगितलेल्या कथा, घटना यांचे स्मरण करण्या पुरते मर्यादित नाही; तर हे सण एक प्रेरणा आहेत असे मला वाटते. सद्यस्थितीत हिंदू समाजाने, या सण उत्सवांमधून घेण्याची प्रेरणा, या बद्दल या लेखामध्ये आम्ही काही विचार मांडत आहोत.

एकंदरीतच घडणाऱ्या घटना, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता, हिंदू समाजामध्ये, जात, पंथ, प्रांत, भाषा अश्या अनेक बाबींवरून परस्पर द्वेष भावना उत्पन्न करण्याचे कुटील कारस्थान; काही समाजघटकांकडून केले जात आहेया द्वेष भावना पसरवताना, हिंदू परंपरांतील भिन्नता यांचाही आधार घेतला जातो आहे असे दिसून आले. हिंदू समाजामध्ये काही परंपरा, रितीरिवाज, या मध्ये भिन्नता जरूर आहे परंतु एक बाब इथे लक्षात घेतली पाहिजे की; ही भिन्नता म्हणजे भेद किंवा वाद नव्हेत तर ही विविधता आहे. कोणत्याही कुटुंबामध्ये व्यक्ती व्यक्ती च्या, वागण्यात, बोलण्यात, आवडी निवडी मध्ये आढळणारी भिन्नता हा त्यांच्यातील भेद किंवा वाद ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे हिंदू समाजातील  विविधता हा परस्परातील भेद ठरू शकत नाही.

दुर्दैवाने जर कोणताही हिंदू अश्या विविधतेला भेद मानून उच्च निचतेचे भाव मनात ठेवत असेल तर ते हिंदुहिता साठी बाधक आहे आणि अश्या विघातक प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींना वेळीच समज देणे आवश्यक आहे असेच मला वाटते.  वास्तवात अश्या प्रवृत्ती या व्यक्तिसापेक्ष असतात, त्यांच्या दोषांचे खापर हे समस्त समाजावर फोडणे हे देखील गैरच आहे.

आजकाल आपल्या संस्कृतीतील परंपरा, उत्सव आदी बाबींचा अभ्यास करता, केवळ समाज विघातक शक्तींनी स्थापन केलेल्या विमर्शालाच (नरेटिव्ह ) सत्य मानून आपणच आपल्या संस्कृतीवर, धर्मावर ताशेरे ओढणे हे देखील गैर आहे.

जर कोणाला धर्म, संस्कृती या बद्दल काही बाबी अमान्य असतील तर निश्चितच त्या समाजापुढे मांडाव्यात परंतु असे करत असताना, एकतर्फी विचारधारा किंवा कसलाही पूर्वग्रह मनात ठेवू नये. वास्तवात हिंदू संस्कृती ही व्यापक आणि सर्व मतांना सोबत घेऊन जाणारी असल्याने इथे मुक्त चर्चेला वाव आहे. त्यामुळे केवळ आंधळा आक्षेप घेण्या पेक्षा, आपल्याला अमान्य असणाऱ्या बाबी टाळल्या तरी आपण हिंदूंचे हिंदूच राहणार आहोत हे लक्षात ठेवावे. असा सांगोपांग विचार न करणारे हे कथित किंवा छद्म  बुद्धिवादी मानावे लागतील. 

स्वामी विवेकानंदानी त्यांच्या शिकागो येथील भाषणात सांगितल्या प्रमाणे, “ हिंदू धर्म किंवा संस्कृती हीच सर्वसमावेशक संस्कृती आहे. हीच संस्कृती आहे जी अन्य पंथ, धर्म यांचे सहचर्य मान्य करते. परंतु हिंदूंच्या या सर्वसमावेशकतेचा अर्थ असा होत नाही की; हिंदूंनी स्वतः च्या संस्कृतीचा अनुनय सोडून अन्य संस्कृतीचा स्वीकार करावा. अहिंदू संस्कृतीतील काही बाबी या केवळ कथित आधुनिक आहेत म्हणून त्यांचा आंधळेपणाने स्विकार करून स्व-धर्म, स्व-संस्कृती तसेच स्व-देश यांचे नाहक नुकसान होईल असे वर्तन हिंदूंचे असू नये असे मला वाटते.

दुसरे असे की; या जगातील प्रत्येक हिंदू मग त्याची भाषा, प्रांत, पंथ किंवा जात हा काहीही असला तरी तो आपला बांधव किंवा भगिनी आहे ही वृत्ती आणि नीती प्रत्येक हिंदूंनी अवलंबणे आवश्यक आहे.

हिंदू संस्कृती आणि हिंदू परिजन यांच्यावर होणारी आक्रमणे " मला काय त्याचे " अश्या बेजबाबदार किंवा " क्रांतिकारी जन्मावा पण शेजारच्या घरात " अश्या आत्मघाती  निष्क्रियतेने पाहत न बसता आपल्या परीने ती परतवून लावणे हेच सद्य स्थितीत हिंदूंचे कर्तव्य आहे. अवघा हिंदू जेंव्हा एक होऊन अश्या आक्रमणांवर तुटून पडेल तेंव्हा आणि तेंव्हाच आपल्या पुढच्या पिढ्या हिंदू म्हणून जन्माला येतील अन्यथा " एक होता हिंदू " असेच काहीसे म्हणावे लागेल.

सध्याची आक्रमणे ही केवळ शस्त्राचारानेच होत आहेत असे नसून, एखाद्या हळू हळू भिनणाऱ्या विषा प्रमाणे हे आक्रमण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करून होत आहेत. काही ठिकाणी तर उघड उघड धर्मांतरणे होत आहेत, कधी चित्रपट, मालिका, जाहिराती, रिऍलिटी शो, प्रसार माध्यमे, यातून हिंदू विरोधी विमर्श निर्माण करून, तर कधी अहिंदू संस्कृतीची अनाठायी श्रेष्ठता सांगून ही आक्रमणे होत आहेत.

आता त्या मालिकांचेच पहा ना !

मालिकेतील बहुतेक कुटुंबे हि हिंदूच असतात. आपल्याच कुटुंबातील सदस्याला त्रास देत असतात, कपट कारस्थान करत असतात. प्रसंगी एकमेकांचा जिव घेण्यासाठी आसुसलेली असतात. अनैतिक संबंध त्यातून आपल्याच कुटुंबाची केली जाणारी फसवणूक वगैरे सगळा कमर्शियल मसाला घालून तयार होणाऱ्या मालिका आज हिंदू समाजाचे कसले चित्र निर्माण करत आहेत ?

एका गुन्हेगारी संबंधातील मालिकेचा एक भाग पहिला, त्यामध्ये संपूर्ण भागातील पात्रे ही गैर हिंदू समाजातील होते, त्यातील गुन्हेगार, पीडित हे सगळेच गैरहिंदू होते, परंतु तो भाग संपता संपता खरा खलनायक असणारे पात्र हे हिंदू दाखवले गेले.

या प्रकारातुन नेमका कोणता विमर्श (नॅरेटिव्ह) निर्माण होतो ?

माझ्या मते ही सारी बुद्धिभेदाची आक्रमणे आहेत. त्यामुळे हिंदूंना ही असली आक्रमणे थांबवण्यासाठी आता केवळ शस्त्राचारचा पर्याय शिल्लक आहे असे नसून, आपण आपल्या संस्कृतीचा अनादर थांबवणे, तिचा जास्तीत जास्त प्रचार करणे, आणि हिंदू समाजाचे विकृत, चारित्र्यहीन, दुष्टबुद्धीचे चित्र उभा करणाऱ्या मालिकांवर सरळ सरळ बहिष्कार टाकणे हेच या आक्रमणांना खरे उत्तर आहे असे मला वाटते.

यंदाच्या खंडेनवमीला केवळ पारंपरिक शस्त्रांचे पूजन करता; समाज माध्यमे, सामूहिक बहिष्कार, सकारात्मक हिंदू विमर्शाची निर्मिती, हिंदुत्वपूरक लेखन या अश्या नव्या शस्त्रांचे पूजन तथा अंगीकार हिंदू समाजाने केला पाहिजे, एवढेच नव्हे तर, प्रत्येक क्षेत्रामध्ये घडणारे हिंदुत्वाचे दर्शन शोधून ते जगापुढे मांडले पाहिजे असे मला वाटते.

आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो; आपल्या देशाचे दुर्दैव तरी बघा, भारत माता की जय म्हणायला नकार देणारे आजही भारतात आहेत हे समजून घेई पर्यंत, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे देशविघातक राष्ट्रद्रोही निर्माण झालेले दिसतात.

सध्या बंदी घालण्यात आलेली संघटना, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही पूर्वाश्रमीची सिमी ( Students Islamic Movement of India ) या संघटनेचे पुनरुत्थान आहे, असे केरळ सरकारने सांगितले आहे. अल-कायदा, तालिबान यांचेशी या संघटनेचा संबंध असल्याचा संशय देखील व्यक्त होत आहे. ( संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Popular_Front_of_India )

या बंदी विरोधात झालेल्या आंदोलनात ही घोषणाबाजी झाल्याचे स्पष्ट दिसते आहे. (संदर्भ : https://www.youtube.com/watch?v=ma9FLrtOTlE)

अन्य देशातून गैर हिंदू समाज हा भारता मध्ये लोंढ्या सारखा येत आहे, आधी शरणार्थी आणि मग लाभार्थी असा प्रवास करत असताना, इथल्या गैर हिंदूसमाजाला देशविरोधी बनवण्याचे धडे दिले जात आहेत कि काय ? अशी शंका उपस्थित होत आहे.

ज्या पापिस्तान ने फाळणीच्या वेदना दिल्या, असंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या, हजारो सैनिकांचे प्राण घेतले, काश्मीर सारखे नंदनवन स्मशानवत करून टाकले, आजही जो देश भारतामध्ये घुसखोर पाठवून, निरपराध भारतीयांचे प्राण घेण्याचा मनसुबा राखतो, अश्या पापिस्तानच्या समर्थनार्थ होणारी घोषणा बाजी ही काही सिमावर्ती भागात होत नसून पुण्यासारख्या मध्यवर्ती शहरात होत आहे ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

विद्यापीठासारख्या ज्ञानमंदिरात, दहशतवाद्यांचा स्मरण दिन साजरा होतो, भारत तेरे तुकडे होंगे, भारत के बर्बादी तक जंग रहेगी, किंवा विद्यापीठाबाहेर पापिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात असताना, कथित किंवा छद्म (pseudo Seculer)  सहिष्णुतावादी; घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना निष्पाप म्हणतात. विचार करा जी मंडळी देशविरोधी घटनांचा निषेध करत नाहीत ती मंडळी जर हिंदूंच्या कत्तली झाल्या तर त्याचा निषेध करतील काय ? ( संदर्भ : https://www.youtube.com/watch?v=4HzZdLoZueQ )

मुस्लिम चालीरीती पाळायला नकार दिल्यामुळे, मुंबई मधील एका हिंदू महिलेची तिच्या मुस्लिम नवऱ्या कडून झालेली हत्या, हिजाब प्रकरणात कर्नाटकमध्ये झालेली हर्षा बजरंगीची हत्या, नुपूर शर्मा प्रकरणात महाराष्ट्रसह अन्य ठिकाणी झालेल्या हत्या या साऱ्या गोष्टी बघून जर अजूनही हिंदू ऐक्याची आवश्यकता भासत नसेल तर, आजचा निद्रिस्त हिंदू समाज हा उद्याचा उध्वस्त हिंदू समाज झाल्या शिवाय राहणार नाही.

मुद्दे अनेक आहेत, प्रश्न देखील अनेक आहे पण उत्तर मात्र एकच आहे आणि ते म्हणजे हिंदुत्व.  

जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते की;हिंदूंनो ! आपल्या डोळ्यावर असलेली, आत्मघातकी आंधळी सहिष्णुतेची झापडे दूर करा, लक्षात घ्या हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ हिंदूच पुढे येतात हा इतिहास आहे.

बघा ! विचार करा !

यंदाची विजयादशमी ही हिंदू आणि हिंदू ऐक्यावर करणाऱ्या अलगतावादी, आक्रमणवादी, वितंडवादी, असुरी प्रवृत्तीरुपी दैत्यांचा संहार करण्याचा संकल्प करून साजरी करूया !

चला; हिंदू ऐक्याची विजयादशमी साजरी करूया !



 

Comments